पनवेल तहसिलदार कार्यालयात कोविड-१९ कॉल सेंटर सुरू

पनवेल तहसिलदार कार्यालयात कोविड-१९ कॉल सेंटर सुरू

पनवेल तहसील कार्यालयात कॉल सेंटर वैद्यकीय सुविधांसाठी संपर्क साधण्याचे आवाहन नवीन पनवेल, ता. ८ (वार्ताहर) ः कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यात तातडीने उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्व तहसील कार्यालयांमध्ये कोविड-१९ कॉल सेंटर सुरू करण्याच्या सूचना दिल्‍या होत्या. त्यानुसार पनवेल तहसील कार्यालयात कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. ०२२-२७४५२३९९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून नागरिक कोविड-१९, खाटांचे व्यवस्थापन, ॲम्बुलन्स तसेच अन्य वैद्यकीय सुविधांची माहिती विचारू शकतात, वैद्यकीय मदत व मार्गदर्शन मिळवू शकतात, अशी माहिती पनवेल तहसीलदार विजय तळेकर यांनी दिली आहे. कोरोना रुग्‍णसंख्या वाढत असून नागरिकांनी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांचे पालन करावे, घाबरून न जाता लसीकरण करून घ्यावे, मास्क वापरावा, सोशल डिस्‍टन्सिंगचे पालन करावे, सॅनिटायजरचा वापर करावा, हात वारंवार स्वच्छ धुवावेत, कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com