ठाण्यात संसर्ग रोखण्यासाठी सहाय्यक आयुक्तांचा वॉच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात संसर्ग रोखण्यासाठी सहाय्यक आयुक्तांचा वॉच
ठाण्यात संसर्ग रोखण्यासाठी सहाय्यक आयुक्तांचा वॉच

ठाण्यात संसर्ग रोखण्यासाठी सहाय्यक आयुक्तांचा वॉच

sakal_logo
By
संसर्ग रोखण्यासाठी सहायक आयुक्तांचा वॉच डिसेंबर अखेरीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे; तरीही नागरिकांना कोरोना या आजाराचे गांभीर्य नसल्याचे शहरात होणाऱ्या गर्दीवरून दिसून येत आहे. त्यात मास्क न लावणे, गर्दी करणे, यामुळे ठाणे पालिका प्रशासनाने निर्बंध कडक करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आता प्रत्येक सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पथकांच्या माध्यमातून गर्दीच्या ठिकाणी विशेष ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. कोरोनासह ओमिक्रॉनचे रुग्णही सध्या मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. या आजाराचे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण ठाणे महापालिका हद्दीत आढळून येत आहेत. त्यामुळे पालिकेने निर्बंध पुन्हा कडक करण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सहाय्यक आयुक्तांची बैठक घेऊन त्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार प्रत्येक सहाय्यक आयुक्ताने दोन पथकांच्या माध्यमातून सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास गर्दीच्या ठिकाणी वॉच ठेवण्यास सुरुवात केली आहे. मास्क न लावल्यास ५०० रुपयांचा दंड आकारला जात आहे. तसेच ठाणेकरांनी सामायिक अंतर नियमाचे पालन करावे, गर्दी करू नये, हॉटेलमध्ये ५० टक्के क्षमता असावी या उद्देशाने जनजागृतीदेखील केली जात आहे. नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत सर्वाधिक वदर्ळीच्या ठिकाणी स्थानक परिसर, जांभळी नाका, मासुंदा तलाव, येथील दुकाने, हॉटेल, बार, भाजी मार्केट आदी ठिकाणी नेहमीच गर्दी दिसून येते. त्यामुळे या ठिकाणी नौपाडा प्रभाग समितीच्या माध्यमातून दोन सत्रात विशेष वॉच ठेवला जात आहे. यामध्ये सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे हे स्वत: जनजागृती करून मास्क आणि सामायिक अंतर नियमाचे पालन करण्याचे आवाहन करीत आहेत. ...तर अस्थापना होणार सील ज्या आस्थापनांच्या ठिकाणी गर्दी होऊनही त्यांना सूचना दिल्यानंतर त्यांचे पालन होत नसेल, तर त्यांना १० हजारांचा दंड आकारला जात आहे. यापुढेही जाऊन वारंवार हॉटेल किंवा दुकानदारांकडून नियमांचे उल्लंघन होत असेल, तर त्यांच्या आस्थापना सील करण्यात येतील, असा इशारादेखील पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top