ST आंदोलनात कोट्यवधींचा गैरप्रकार?, पोलिसात तक्रार | Maharashtra government | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST bus
कोट्यवधीच्या गैरप्रकाराप्रकरणी पोलिसात तक्रार

ST आंदोलनात कोट्यवधींचा गैरप्रकार?, पोलिसात तक्रार

sakal_logo
By

मुंबई : कायदेशीर दायित्व नसताना खोटे आश्वासन देऊन, करोडो रुपये जमा करून कर्मचाऱ्यांची फसवणूक (workers fraud issue) केल्याप्रकरणी एसटी कामगार सेनेचे राज्याचे कार्याध्यक्ष विजय मालोकार (Vijay malokar) यांनी अकोट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आतापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांकडून विलीनीकरणाच्या न्यायालयीन लढ्यासाठी प्रत्येकी ३०० ते एक हजार रुपयांपर्यंत पैशांची मागणी (Money demand) केल्याची चर्चा होती. मात्र, आता तक्रार दाखल झाल्याने या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता आहे. (Money fraud possibilities in st bus corporation police complaint filed)

हेही वाचा: सदावर्तेने एसटी संपातील कोटी रुपयांचा हिशोब द्यावा!

एसटी महामंडळात गेल्या दोन महिन्यांपासून बेकायदेशीर पद्धतीने संप तथा दुखवटा सुरू आहे. यादरम्यान संपकरी संघटनेच्या कर्मचारी, पदाधिकाऱ्यांची वेगवेगळ्या पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण करून, कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप मालोकार यांनी केला आहे. संपकरी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर, सरचिटणीस शेषराव ढोणे यांनी हा बेकायदा संप पुकारला होता. कर्मचाऱ्यांची राज्य शासनात विलीनीकरणाची इच्छा असल्याने या संपाला बळ मिळाले, एसटी प्रशासनाने संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर शिस्त व आवेदन कार्यपद्धती व इतर प्रशासकीय कार्यवाही करण्यास सुरुवात केली. संपकऱ्यांचे निलंबन, बदलीचे आदेश काढले, या कारवाईचा फायदा घेऊन संपकरी नेत्यांनी सर्वसामान्य एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करून तब्बल करोडो रुपयांचा गैरप्रकार केल्याचा आरोपही विजय मालोकार यांनी केला आहे.

हेही वाचा: Mhada|गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांना अटक करा : गुणरत्न सदावर्ते

काय आहे घटना?

संपात सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाई रद्द करून देतो, शिवाय न्यायालयात प्रकरण दाखल करून, ती कार्यवाही रद्द करून देतो, अशी खोटी भूलथाप देऊन, तब्बल ७० हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करून कोटींची माया गुजर यांनी गोळा केली. यामध्ये अकोट आगाराचे वाहक प्रफुल्ल गावंडे यांनी अजय गुजर यांच्या बँक खात्यावर ७४ हजार ४०० रुपये पाठवले आहेत. त्यावरून अकोट पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

नेमकी कुठे आणि कशा प्रकरणी तक्रार झाली अद्याप माहिती नाही. खासगी कामासाठी गावी आलो आहे. सोमवारी मुंबईत आलो की यावर बोलता येईल. - अजय गुजर, अध्यक्ष, महाराष्ट्र कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटना.

संपकरी कर्मचाऱ्यांकडून पैसे लाटून कोटी रुपयांचा गैरप्रकाराची शक्यता आहे. संपातून बेकायदेशीर पद्धतीने पैसे गोळा करण्याची प्रथा भविष्यात पडू शकते. त्यामुळे प्रकरणाची कायदेशीर चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी, शिवाय या प्रकरणात शेवटपर्यंत लढा देईन. - विजय मालोकार, कार्याध्यक्ष, एसटी कामगार सेना.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top