नगरसेवकांचा निधी पायाभूत सुविधांसाठी वळवला

नगरसेवकांचा निधी पायाभूत सुविधांसाठी वळवला

नगरसेवकांचा निधी पायाभूत सुविधांसाठी शिवसेनेच्या दोन सदस्यांची विनंती सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ८ : नगरसेवकांच्या निधीतून विकासकामे होणे अपेक्षित असताना मतदारांना आकर्षित करण्यासाठी नगरसेवकांकडून विविध योजनांसाठी निधीचा वापर केला जातो. यंदा फूड ट्रक, छत्रीवाटप करण्याची कल्पना शिवसेना नगरसेवकांना चांगलीच महागात पडली आहे. शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी या योजनेसाठी राखीव ठेवलेला निधी पायाभूत सुविधांसाठी वळवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे अंधेरी पश्‍चिम येथील नगरसेवक राजू पेडणेकर यांनी त्यांच्या विभागातील नागरिकांना स्वयंरोजगारासाठी फूड ट्रक वितरित करण्यासाठी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. त्याचप्रमाणे घाटकोपर येथील शिवसेनेचे नगरसेवक तुकाराम पाटील यांनी छत्री, टॅब वाटपासाठी ३० लाख रुपयांचा निधी राखून ठेवला होता. आता हा निधी खर्च होत नसल्याने त्यांनाही निधी विकास कामांसाठी वळवण्याची विनंती केली आहे. तसा प्रस्ताव पुढील आठवड्यात होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. महापौर किशोरी पेडणेकर, माजी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्यासह अनेक नगरसेवकांनी अशाच प्रकारे फूड ट्रक वितरित करण्यासाठी निधी राखून ठेवला होता; मात्र फूड ट्रकसाठी महापालिकेचे धोरण नसल्याने त्याचा वापरच होऊ शकत नाही. त्यामुळे सर्वांनीच आता निधी वळवण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत रमाकांत रहाटे, प्रज्ञा बुतकर, चंद्रशेखर वायंगणकर या शिवसेनेच्या नगरसेवकांनी फूड ट्रकसाठी राखून ठेवलेला निधी वळवून घेतला आहे. आता आर्थिक वर्ष संपत असताना अनेक नगरसेवकांकडून असे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. --- साड्यावाटपासाठीही निधीची तरतूद नगरसेवक निधीतून पायाभूत सुविधा पुरवण्यासारखी विकास कामे होण्याची गरज आहे. महापालिका स्वत: विद्यार्थ्यांना २७ शैक्षणिक वस्तूंचे वितरण करते, तरीही काही नगरसेवकांकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू वितरित करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येते. त्याचबरोबर कुर्ला परिसरात काही नगरसेवकांनी गरजू महिलांना साडी वाटपासाठीही निधीची तरतूद केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com