महापौर पीपीई किट घालत अॅक्शमोडमध्ये

महापौर पीपीई किट घालत अॅक्शमोडमध्ये

महापौर पीपीई किट घालत अॅक्शन मोडमध्ये कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बीकेसी कोविड केंद्राचा आढावा सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ८ : कोविडची तिसरी लाट उसळू लागल्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आल्या आहेत. पीपीई किट परिधान करून शनिवारी महापौरांनी वांद्रे कुर्ला संकुलातील कोविड केंद्राचा आढावा घेत रुग्णांशी चर्चा केली. या केंद्रात दाखल असलेल्या ९५० रुग्णांपैकी एकही रुग्ण अतिदक्षता विभागात नसल्याचे महापौरांनी नमूद केले. रुग्णांना पुरवत असलेल्या सुविधांचा आढावा घेण्यासोबतच महापौरांनी रुग्णांच्या तब्येतीचीही विचारपूस केली. रुग्णांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असल्याची माहिती महापौरांनी दिली. केंद्रातील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी आल्याचे महापौरांनी या वेळी सांगितले. सध्या या कोविड केंद्रात ९५० रुग्ण दाखल असून त्यातील ६७० रुग्णांना कृत्रिम प्राणवायूची गरज नसल्याचे महापौरांनी सांगितले. या वेळी कोविड केंद्राचे अधिष्ठाते डॉ. राजेश डेरे उपस्थित होते. कोविडचे रुग्ण चारपट वाढले आहेत; पण नागरिकांनी घाबरू नये. मात्र, काळजी घेण्याची गरज आहे, असे आवाहन महापौरांनी केले. नागरिकांनी कोविड नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाण वावरताना मास्कही वापरला पाहिजे, असे महापौरांनी सांगितले. ----- मजुरांनी मुंबई सोडू नये! कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे; मात्र कोणत्याही परिस्थितीत मजुरांनी मुंबई सोडू नये, असे आवाहनही महापौरांनी केले. सर्वांनी लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. ---- विरोधकांना टोला भाजपसह मनसेही लॉकडाऊन, वाढणारा कोविड यावरून शिवसेनेवर टीका करत आहे. यावर बोलताना महापौर म्हणाल्या की, विरोधक नागरिकांची दिशाभूल करत आहेत. काळजी घेतली तर लॉकडाऊन लागणार नाही. विरोधकांनी संभ्रम निर्माण करू नये. कोविड बेड्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. विरोधकांच्या आरोपांना मी कृतीतून उत्तर देते, असा टोलाही महापौरांनी लगावला. मिनी लॉकडाऊन हे घाबरविण्यासाठी नाही, तर नागरिकांना सत्य परिस्थिती सांगितली. आजही अनेक भागात गर्दी होत आहे, असे सांगत महापौरांनी नाराजी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com