पालघरमध्ये विद्यार्थ्यांचे लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघरमध्ये विद्यार्थ्यांचे लसीकरण
पालघरमध्ये विद्यार्थ्यांचे लसीकरण

पालघरमध्ये विद्यार्थ्यांचे लसीकरण

sakal_logo
By
अणुविकास विद्यालय लसीकरण पालघर, ता. ९ (बातमीदार) ः प्राथमिक आरोग्य केंद्र, दांडी व जीवन विकास शिक्षण संस्था पालघर यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवारी (ता. ८) अणु विकास विद्यालय, दांडी येथे विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. डॉ. संजय काकडे व संस्थेचे कार्याध्यक्ष वागेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहीम राबवण्यात आली. विद्यालयातील १७६ विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी मराठी माध्यम मुख्याध्यापक अजय राऊत, पर्यवेक्षक शशिकांत चौधरी, इंग्रजी माध्यम मुख्याध्यापिका रेश्मा म्हात्रे तसेच डॉ. निकिता शर्मा व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका व आशाताई यांचे सहकार्य लाभले.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top