‘स्वाभिमान’च्या फलकाचे अनावरण

‘स्वाभिमान’च्या फलकाचे अनावरण

‘स्वाभिमान’च्या फलकाचे अनावरण वाडा, ता. ९ (बातमीदार) ः तालुक्यातील कुडूस विभागातील दूध डेरी व दूध उत्पादक शेतकरी संघटित होऊन स्वाभिमान संघटनेच्या झेंड्याखाली एकत्रित आले आहेत. कुडूस येथे गुरुवारी सायंकाळी स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेश पाटील व तालुकाध्यक्ष रवींद्र मेणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दूध डेरी व दूध उत्पादक संघटनेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी कुडूस विभागातील ४२ दूध उत्पादक शेतकरी स्वाभिमान संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र आले. केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे व स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत आम्ही या संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले असल्याचे उपस्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com