आरे कॉलनीतील अंतर्गत रस्ते होणार चकाचक; दुरुस्ती कामास सुरुवात | BMC update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BMC

आरे कॉलनीतील अंतर्गत रस्ते होणार चकाचक; दुरुस्ती कामास सुरुवात

sakal_logo
By

जोगेश्वरी : आरे कॉलनीतील (Mumbai aarey road) अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाला मयर नगर बस थांबा येथे शनिवारपासून (ता. ८) सुरुवात (road repairing) करण्यात आली. या वेळी आरेतील एकूण चार अंतर्गत रस्ते दुरुस्तीच्या कामाचा आरंभ झाला. या दुरुस्तीसाठी एक कोटी ९७ लाख रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर करण्यात आले आहेत; तर लवकरच मुंबई महापालिकेकडून (bmc) रुपये ४७ कोटी खर्चून आरेतील सुमारे सात किलोमीटरच्या मुख्य रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनही उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या हस्ते होणार आहे. (Mumbai aarey roads reparimg works started as bmc gives funding)

हेही वाचा: खाकी वर्दीवर रक्ताचा डाग; मद्यधुंद अवस्थेत डिलिव्हरी बॉयला उडवलं

आरे कॉलनीतील कार्यकारी अभियंत्यांमार्फत अंतर्गत १० रस्ते प्रस्तावित केले होते. त्‍यानुसार यात मयूर नगर बस थांबा ते आरे युनिट क्र. ५ मार्केटपर्यंतचा रस्ता (१५०० मीटर), आरे युनिट क्र. ६ आरे रुग्‍णालय युनिट क्र. १६ पर्यंतचा रस्‍ता (६०० मीटर), पिकनिक पॉइंट ते आरे युनिट क्र. २६ पर्यंतचा रस्ता (२५० मीटर) व छोटा काश्मीर उद्यान गेट ते आरे युनिट क्र. ३१ पर्यंतचा (२५० मीटर) या रस्तेदुरुस्तीचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे.

त्यासाठी एक कोटी ९७ लाख रुपये खर्चास मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती जोगेश्‍वरीचे आमदार रवींद्र वायकर यांनी दिली. याप्रसंगी विश्‍वनाथ सावंत, नगसेविका रेखा रामवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कदम, भाई मिर्लेकर, बाळा तावडे, संदीप गाढवे, अपर्णा परळकर, हर्षदा गावडे, मयूरी रेवाळे, सुरेखा गुटे, पूजा शिंदे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai NewsBMC
loading image
go to top