समंथाने यशोदा चित्रपटाच्या शूटिंगला केली सुरवात

समंथाने यशोदा चित्रपटाच्या शूटिंगला केली सुरवात

समंथाने यशोदा चित्रपटाच्या शूटिंगला केली सुरुवात आपल्या हट के लूकने आणि बोल्ड अभिनयाने आपली वेगळी ओळख निर्माण करणारी साऊथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या ती ‘पुष्पा’ चित्रपटातील आयटम साँगमुळे कमालीची चर्चेत आहे. गेल्या वर्षी समंथाने तिच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. यशोदा असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. आता समंथा या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. गोव्यात सुट्ट्या व्यतीत करून नुकतीच ती या चित्रपटाच्या शूटिंगवर परतली आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी समंथा जिममध्ये खास मेहनत करतानादेखील दिसली होती. यावरून चित्रपटातील तिची भूमिका खास असणार असे दिसत आहे. यशोदा हा चित्रपट पूर्णपणे सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. समंथा यामध्ये एका दमदार भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात, वरलक्ष्मी सरथकुमार आणि उन्नी मुकुंदन हे कलाकारदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. समंथाच्या या नव्या चित्रपटाला प्रेक्षक पसंती देणार का, हे पाहणे महत्त्वाचे असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com