आगीच्या जबड्यातून १४८ नागरिक व २२८ पक्षांना जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आगीच्या जबड्यातून १४८ नागरिक व २२८ पक्षांना जीवदान
आगीच्या जबड्यातून १४८ नागरिक व २२८ पक्षांना जीवदान

आगीच्या जबड्यातून १४८ नागरिक व २२८ पक्षांना जीवदान

sakal_logo
By
आगीच्या जबड्यातून १४८ नागरिक व २२८ पक्ष्यांना जीवदान वर्षभरात अग्निशमन दलाच्या जवानांची कामगिरी प्रसाद जोशी वसई, ता.९ ( बातमीदार) ः वसई-विरार शहर महापालिकेच्या अग्निशमन दलातील केंद्र व उपकेंद्राच्या जवानांनी २०२१ साली ६४२ आगीच्या घटनेवर नियंत्रण मिळवीत मालमत्तेचे होणारे नुकसान थांबवले आहे. याबरोबरच १४८ नागरिक व २२८ पक्ष्यांना व प्राण्यांना जीवदान दिले. वसई-विरार शहर महापालिकेकडे स्वतंत्र अग्निशमन विभाग आहे. वेगवेगळ्या दुर्घटनावेळी विभाग तत्परतेने हजर राहण्याचे काम करतो. आगीच्या घटना वाढत असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे. वसई पूर्व, गावराईपाडा, चिंचपाडा, वालीव, सातिवली, गोलानी, भोईदापाडा, वसई महामार्ग, तसेच विरार परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत आहे. अनेक ठिकाणी अनधिकृत पत्र्यांचे शेड उभारले जात आहेत. अनधिकृत बांधकामाबाबत महापालिकेकडूनच अनेक ठिकाणी दुर्लक्ष किंवा कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे कामगारांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. गोदामे, सदनिका यांसह सार्वजनिक ठिकाणी तसेच महावितरण आदी ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडत असतात. झपाट्याने होणारे नागरीकरण व दाटीवाटीच्या वस्तीमुळे आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. एका रुग्णालयाला आग लागून १५ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना मागे घडली होती; तर गुजरातकडे जाणाऱ्या गाडीला देखील आगीचा धोका निर्माण झाला होता; परंतु अग्निशमन दलाने सतर्कता दाखवून या दुर्घटनेवर मात केली होती. वसई-विरार शहरात पशू-पक्ष्यांचा देखील वावर असतो. यात नाग, साप, अजगर, कबुतर, घोणस यासह विविध पक्षी-पशू आढळतात. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरत असते; परंतु त्यांचा अधिवास असणाऱ्या ठिकाणी त्यांना सुखरूप सोडता यावे, म्हणून अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी धाव घेतात. --------------------------------- नागरिक व त्यांच्या मालमत्तेला आगीमुळे हानी पोहचू नये याकरिता अग्निशमन दल विभाग सतर्क असतो. संपर्क साधल्यावर त्वरित कार्यवाही केली जाते. अग्निसुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली जातात. औद्योगिक वसाहतीत अग्नीसुक्षेविषयी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याची नियमावली व मार्गदर्शन देखील केले जाते. - दिलीप पालव, अधिकारी अग्निशमन दल, महापालिका.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top