पालिका लसीकरण केंद्रावर आजपासून मोफत बुस्टर मात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिका लसीकरण केंद्रावर आजपासून मोफत बुस्टर मात्रा
पालिका लसीकरण केंद्रावर आजपासून मोफत बुस्टर मात्रा

पालिका लसीकरण केंद्रावर आजपासून मोफत बुस्टर मात्रा

sakal_logo
By
आजपासून बूस्टर मात्रेस आरंभ सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ९ : लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या आरोग्य आणि पहिल्या फळीतील कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना आजपासून (ता. १०) बूस्टर डोस देण्यात येणार आहे. पालिकेच्या लसीकरण केंद्रावर बूस्टर मात्रा मोफत देण्यात येणार आहे. खासगी लसीकरण केंद्रावर राज्य सरकारने ठरवलेल्या २५० रुपये या दरात बूस्टर मात्रा देण्यात येणार आहे. या मात्रेसाठी पात्र लाभार्थ्यांनी दोन्ही लशीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड सोबत घेऊन येणे गरजेचे आहे. ‘वॉक-इन’ पद्धतीने बूस्टर मात्रा देण्यात येणार आहे. मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. आजवर पहिली मात्रा एक कोटी लाभार्थ्यांनी घेतली आहे. दुसरी मात्रा ९० टक्के लाभार्थ्यांनी घेतली आहे. केंद्राच्या मंजुरीनंतर मुंबईसह देशात १० जानेवारीपासून बूस्टर मात्रा दिली जाईल. यासाठी तयारी पूर्ण झाल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. ... लाभार्थी आरोग्य कर्मचारी - १ लाख ८८ हजार पहिल्या फळीतील कर्मचारी - १ लाख ४७ हजार ज्येष्ठ नागरिक - १० लाख २० हजार ...
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top