महिलेच्या प्रसंगावधानामुळे चोरट्यांचा पळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलेच्या प्रसंगावधानामुळे चोरट्यांचा पळ
महिलेच्या प्रसंगावधानामुळे चोरट्यांचा पळ

महिलेच्या प्रसंगावधानामुळे चोरट्यांचा पळ

sakal_logo
By
महिलेच्या प्रसंगावधानामुळे चोरट्यांचा पळ पनवेल (प्रतिनिधी) : महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून जाणाऱ्या चोरांना रिकाम्या हाती पळून जावे लागले आहे. महिलेने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे चोरटे पळून गेले आहेत. सुरेखा चाळके असे धाडसी महिलेचे नाव आहे. सुरेखा या दांडेकर हॉस्पिटल-आगरी समाज हॉल येथून मोबाईलवर बोलत जात होत्या. त्याचवेळी मागून आलेल्या दुचाकीवरील चोरट्यांनी त्यांच्या मानेवर हात टाकला. या वेळी प्रसंगावधान राखत चाळके यांनी उलट्या हाताने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्यांच्या गळ्यातील दागिने त्यांच्या ड्रेसमधेच पडले. त्यांनी आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे नागरिक जमले. त्यामुळे चोरट्यांना रिकाम्या हाती पळून जावे लागले. याची माहिती त्‍यांनी पनवेल शहर पोलिसांना दिली आहे. या धाडसी महिलेची भेट घेऊन नगरसेविका प्रीती जॉर्ज-म्हात्रे यांनी कौतुक केले.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top