विद्यार्थ्यांची पुस्तकांची अडचण दूर

विद्यार्थ्यांची पुस्तकांची अडचण दूर

विद्यार्थ्यांची पुस्तकांची अडचण दूर माणगावमध्ये गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू माणगाव, ता. ९ (वार्ताहर) : गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा हेतू स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवणे हा आहे. अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची पुस्तके विकत घेण्यास अडचणी येतात. अशा गरजू विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने माणगाव येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या, तुम्ही वेळ वाया घालवू नका, कोणत्या वेळेत काय करायचे आहे, हे ठरवा. योग्य नियोजन करून गरुड झेप घ्या, भरारी घ्या, या संकल्पनेनुसार माणगाव तहसीलदार प्रियंका आयरे यांनी माणगावमध्ये मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विद्यार्थ्यांना केंद्रावर हजर राहणे शक्य नसल्याने त्यांचे नुकसान होऊ शकते. यासाठी दूरदुष्यप्रणाली किंवा ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शनाचा लाभ घेण्याची सुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे तहसीलदार आयरे यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यातून आयएएस अधिकारी होऊन गेले आहेत. मात्र, तरीही जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेतला टक्का कमी असल्याने जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी तालुका स्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याच्या सूचना केल्या. त्याला अनुसरून माणगाव महसूल अंतर्गत केंद्र सुरू झाले आहे. गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात नोंदणी करण्यासाठी नायब तहसीलदार बी. वाय. भाबड (७०८३८८२०८१), महसूल सहायक तुषार सुर्वे (९६६५८९०४२१) आणि डॉ. प्राध्यापक शीनगारे (९८६०५४५६९८) यांच्याजवळ संपर्क करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन आयरे यांनी केले आहे. केंद्रातील सुविधा या गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन माणगाव केंद्रात २४/७ अभ्यासिका, अद्ययावत लायब्ररी, प्रत्येक शनिवारी व रविवारी सामूहिक चर्चेसाठी सभागृह उपलब्ध करून दिला आहे. स्पर्धा परीक्षेतून निवड झाल्यास आकर्षक पारितोषिक देण्यात येणार आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तज्‍ज्ञ शिक्षक व विद्यमान अधिकारी यांचे दर शनिवार व रविवारी ऑनलाईन व्याख्यान देणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com