culprit arrested
culprit arrestedsakal media

बनावट स्मार्ट कार्डद्वारे वाहनांची नोंदणी करणारा एजंट पोलिसांच्या जाळ्यात

नवी मुंबई : नवी मुंबई आरटीओ कार्यालयातील (Navi Mumbai RTO) अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे बनावट स्मार्ट कार्डद्वारे (fake smart card) ऑडी कारचे दुसऱ्याच्या नावाने हस्तांतर करण्याच्या प्रयत्नात असलेला एजंटला वाहतूक पोलिसांनी पकडले. एडव्हीन भीष्म असे त्‍याचे नाव असून एपीएमसी पोलिसांनी त्याला अटक (culprit arrested) केली. एजंटने नवी मुंबईसह इतर आरटीओ कार्यालयात अशाच पद्धतीने फसवणुकीचे प्रकार केल्‍याची शक्‍यता व्यक्त होत आहे. (Navi mumbai traffic police arrested a culprit in vehicle fake registration crime)

culprit arrested
मुंबईकरांना दिलासा! सहा हजारांनी रूग्णसंख्या घटली

एडव्हिन भीष्म हा कांदिवलीत राहात असून विविध आरटीओमध्ये एजंटची कामे करतो. त्यामुळे त्याची विविध आरटीओ कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी ओळख आहे. गत ऑक्टोबर महिन्यात भीष्‍म नवी मुंबईच्या आरटीओ कार्यालयात एमएच-४-एडब्ल्यू-९९५४ या क्रमांकाच्या ऑडी कार दुसऱ्याच्या नावाने नोंदणी करण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने कारचे बनावट स्मार्ट कार्ड (नोंदणी प्रमाणपत्र) सादर केल्यानंतर अधिकारी गजानन नांदगावकर यांनी कार्डची रिडरमध्ये तपासणी केली. त्यात ऑडी कारची माहिती नसल्याचे आढळले.

त्यामुळे त्यांनी सदर स्मार्ट कार्डची सत्यता तपासण्यासाठी आरटीओचे स्मार्ट कार्ड तयार करणाऱ्या रोसमार्टा टेक्नोलॉजी लि.. कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे दिले. कंपनीकडून स्मार्ट कार्डची पडताळणी सुरू असतानाच भीष्मने डिसेंबरमध्ये पुन्हा कारचे दुसरे बनावट स्मार्ट कार्ड तयार करून आरटीओ कार्यालयात हस्तांतर करण्यासाठी सादर केले. यावेळी देखील नांदगावकर यांनी सदर स्मार्ट कार्डची रिडरमध्ये तपासणी केली असता, त्यात देखील ऑडी कारची माहिती उपलब्ध नसल्याचे आढळले. भीष्‍म याने सादर केलेले स्मार्ट कार्ड वेगवेगळ्या सिरीयल नंबरचे एक बोरीवली तर दुसरे परभरणीतील आरटीओचे असल्याचे लक्षात आले. कार्डवरील डिजिटल स्वाक्षरीही खोटी असल्याचे आढळले आले.

खोटी डिजिटल सही एडव्हीन भीष्‍म याने आरटीओची राजमुद्रा व प्रादेशिक परिवहन प्रशासनाचा लोगो असलेले बनावट स्मार्ट कार्ड छापून त्यावर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची बनावट खोटी डिजिटल सही केली. आणि वाहनाची नोंदणी करण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात आल्यानंतर गजानन नांदगावकर यांनी एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार भीष्म याला अटक केली आहे. त्‍यामुळे स्‍मार्ट कार्ड वापरताना सावधता बाळगण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com