दिव्यांगांना जयपूर फुट, कॅलिपरचे वाटप

दिव्यांगांना जयपूर फुट, कॅलिपरचे वाटप

दिव्यांगांना जयपूर फूट, कॅलिपरचे वाटप विरार (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील दिव्यांगांना जयपूर फूट आणि कॅलिपर वाटपाचा कार्यक्रम विरार पूर्वेतील मनवेलपाडा येथील सकूबाई हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. सामाजिक न्याय मंत्रालय, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, अपंग हक्क विकास मंच, महात्मा गांधी सेवा संघ आणि जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांग व्यक्तींसाठी लागणारे कृत्रिम अवयव व साधनांचे अगोदरच मोजमाप घेण्यात आले होते. माजी नगरसेविका संगीता भेरे यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमाला नालासोपारा आमदार क्षितिज ठाकूर, राजेंद्र ढगे, जहीर खान, लायन्स क्लबच्या श्रद्धा मोरे, अण्णासाहेब तिगोटे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अनिल पाझारे आणि शमीम खान उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com