रायगड जिल्ह्यात हुडहुडी

रायगड जिल्ह्यात हुडहुडी

रायगड जिल्ह्यात हुडहुडी अनेक तालुक्यांत किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी पाली, ता. १० (वार्ताहर) : मागील काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात गुलाबी थंडी पडत आहे. आता ही थंडी अधिक वाढली असून शनिवारी पडलेल्या अवकाळी पावसानंतर अनेक तालुक्यांत किमान तापमान घसरून १५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले. या हुडहुडी भरणाऱ्या थंडीपासून बचावासाठी नागरिकांना गरम कपडे आणि शेकोटीचा आधार घ्यावा लागला. डिसेंबर अखेरपासून जिल्ह्यात थंडीचा जोर होता. काही भागात तापमान १६ अंशांपर्यंत खाली घसरले होते. त्यामध्ये रविवारी आणि सोमवारी घसरण झाली. तापमानाचा पारा १५ अंशांपेक्षा खाली घसरला. कमाल तापमान २१ अंश सेल्सिअसवर आले आहे. गारठ्यापासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी सकाळी व संध्याकाळी नागरिक शेकोटी भोवती जमा झालेले दिसत आहेत. वाढत्या थंडीबरोबरच सर्दी, खोकला हे साथीचे आजार बळावत असल्याने थंडीमध्ये आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना डॉक्टर करत आहेत. थंडी वाढल्याने धुक्याचे प्रमाण मात्र सर्वत्र कमी झाले आहे. येत्या काही दिवसांत तापमानाचा पारा अजून खाली उतरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दिवसभर गारवा असल्याने वातावरण अगदी आल्हाददायक झाले आहे. या हंगामातील पहिल्या कडाक्याच्या थंडीचा अनेकजण आनंद लुटत आहेत. तापमान १५ अंशांपर्यंत आलेल्या तालुक्यांमध्ये कर्जत, माणगाव, तळा यांचा समावेश आहे. ........................ मागील अनेक दिवस थंडी खूप कमी जाणवत होती. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीलाच कडाक्याची थंडी पडली. त्यामुळे अचानक गरम कपड्यांना मागणी वाढली आहे. - प्रशांत खैरे, उपाध्यक्ष, व्यापारी असोसिएशन, पाली. ................. आरोग्य सांभाळा थंडी अचानक वाढली आहे. संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव या दरम्यान वाढण्याची शक्यता आहे. दमा व ॲलर्जीचा त्रास असलेल्या व्यक्तींनी धुक्यातून जाणे टाळावे. त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. थंडीचा जोर वाढल्याने खाण्यापिण्यात बदल करणे गरजेचे आहे. जास्त उष्मांक असलेले आणि पोषण देणारे पदार्थ या दिवसांत खाणे योग्य. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. - डॉ. मयूर कोठारी, पाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com