लसीकरणासाठी प्रशासनाने जनजागृती करावी : अदिती तटकरे |Aditi tatkare | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aditi Tatkare

लसीकरणासाठी प्रशासनाने जनजागृती करावी : अदिती तटकरे

sakal_logo
By

रोहा : सरकारच्या (Government) वतीने १५ ते १८ वयोगटातील नवयुवकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम (corona vaccination drive) सुरू केली आहे. रोहे शहराप्रमाणे ग्रामीण भागात या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. लसीकरण मोहीम १०० टक्के यशस्वी करण्यासाठी नगरपालिका व अन्य स्थानिक प्रशासनाने रिक्षा फिरवून दवंडी पिटवावी. तसेच अन्य माध्यमातून जनजागृती करावी, असे आवाहन पालकमंत्री अदिती तटकरे (Aditi tatkare) यांनी केले आहे. (Government should start awareness for corona vaccination says aditi tatkare)

हेही वाचा: मुंबईकरांना दिलासा! सहा हजारांनी रूग्णसंख्या घटली

रोहा नगरपालिकेच्या डॉ. सी. डी. देशमुख शहर सभागृहात नवयुवकांसाठी सुरू असलेल्या लसीकरण केंद्राला तटकरे यांनी भेट देत परिस्थितीची माहिती घेतली. सध्या तालुक्यात बाधितांची संख्या १११ असून १४ जणांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभय ससाणे यांनी दिली.

उपजिल्हा रुग्णालयातील उपअधीक्षक डॉ. अंकिता खेरकर यांनी सध्याची कोरोना परिस्थितीविषयी माहिती देत युवकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. या वेळी मुख्याधिकारी दयानंद गोरे, नगरसेवक मयूर दिवेकर, अहमद दर्जी, महेश कोलटकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अमित उकडे, उपाध्यक्ष चंद्रकांत पार्टे, मजिद पठाण, नीलेश शिर्के, कादिर रोगे, माज सवाल उपस्थित होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top