महेश भोईरला दोन सुवर्ण पदके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महेश भोईरला दोन सुवर्ण पदके
महेश भोईरला दोन सुवर्ण पदके

महेश भोईरला दोन सुवर्ण पदके

sakal_logo
By
महेश भोईरला दोन सुवर्णपदके किन्हवली (बातमीदार) ः अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख क्रीडांगणात पार पडलेल्या ४२ व्या महाराष्ट्र ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत शहापूर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय धावपटू महेश भोईर या लांब उडी (६.४ मीटर) प्रकारात सुवर्ण, ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत (५१.१९ सेकंद) सुवर्ण आणि ८०० मीटर धावण्याच्या (१.५२ मिनिटे) स्पर्धेत रजत पदक पटकावले. ६ ते ८ जानेवारी या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. महेश भोईर हा शहापूर तालुक्यातील गोकुळगावचा रहिवासी आहे. त्याने यापूर्वी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये विविध पदकांना गवसणी घातली आहे. अकोला येथील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महेशचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top