केमिस्टना सेल्फ टेस्ट कीटची माहिती ठेवावी लागणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केमिस्टना सेल्फ टेस्ट कीटची माहिती ठेवावी लागणार
केमिस्टना सेल्फ टेस्ट कीटची माहिती ठेवावी लागणार

केमिस्टना सेल्फ टेस्ट कीटची माहिती ठेवावी लागणार

sakal_logo
By
‘सेल्फ टेस्ट किट’ची माहिती ठेवणे औषधविक्रेत्यांना बंधनकारक पालिका लवकरच नियमावली जारी करणार सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ११ : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या सेल्फ टेस्ट किटच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित आल्यावरही अनेक जण पालिकेला कळवत नसल्याने प्रसाराचा धोका वाढत असल्याने पालिकेने चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे आता कोरोना सेल्फ टेस्ट किटची विक्री करणाऱ्या औषधविक्रेत्यांना टेस्ट किटच्या विक्रीची माहिती ठेवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच नियमावली जारी करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे. तिसऱ्या लाटेत अनेक जण औषध दुकानातून सेल्फ टेस्ट किट्स घेऊन स्वतःहून चाचणी करत आहेत. त्यामुळे कोविडबाधितांची नोंद होत नव्हता. त्यामुळे कोरोनाच्या प्रसाराचा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे पालिका त्याबाबत नव्याने नियमावली जारी करणार आहे. औषधविक्रेत्यांना कोरोना ‘सेल्फ टेस्ट किट’ कुणाला विकली, याबाबतचा रेकॉर्ड ठेवावा लागणार आहे, त्याबाबतच्या सूचनाही महापालिका देणार आहे, अशी माहिती काकाणी यांनी दिली.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top