शिवदुर्ग प्रतिष्ठानकडून माहुलीगड संवर्धन मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवदुर्ग प्रतिष्ठानकडून माहुलीगड संवर्धन मोहीम
शिवदुर्ग प्रतिष्ठानकडून माहुलीगड संवर्धन मोहीम

शिवदुर्ग प्रतिष्ठानकडून माहुलीगड संवर्धन मोहीम

sakal_logo
By
शिवदुर्ग प्रतिष्ठानकडून माहुलीगड संवर्धन मोहीम वसई ता. १२ (बातमीदार) ः माहुलीगडावरील कल्याण दरवाजा व परिसराच्या संर्वधनासाठी वसईच्या शिवदुर्ग प्रतिष्ठानने मोहीम हाती घेतली आहे. प्रतिष्ठानकडून कल्याण दरवाजाच्या डाव्या बाजूची भिंत व जवळील कातळ यांच्यामधून पाण्याचा प्रवाह वाहत जाईल अशा पद्धतीने कामाची सुरुवात केली. कल्याण दरवाजातील टाक्याची स्वच्छता केली. गडावरील कचरा, गवत व अन्य टाकाऊ साहित्य काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. या मोहिमेत शिवदुर्ग प्रतिष्ठानचे अतुल कापटे, प्रथमेश चव्हाण, आनंद जाधव, प्रवीण झेंडे, मयूर जाधव, सूरज साळवी, प्रशांत शिवाजी गीते, संजय माने, प्रेम विमल प्रकाश महाले, सिद्धार्थ सुमन, गुलाबराव बाविस्कर, मीर भोईर, सिद्धेश जाधव सहभागी झाले होते.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top