Cold-fever-patient
Cold-fever-patientsakal media

वसई विरारमध्ये खोकला, सर्दीच्या रुग्णांचा नागरिकांना 'ताप'

वसई-विरारमध्ये ताप, सर्दीचे रुग्ण वाढले उपचारांसाठी रुग्णालयासमोर रांगा

वसई : वसई-विरार (vasai-virar) शहरातील नागरिक कोरोनाशी लढा देत असताना (corona patients) वातावरणात झालेल्या बदलामुळे ताप, सर्दी, खोकल्याने (cold, fever patients) बेजार झाले आहेत. दवाखान्यांमध्ये उपाचारांसाठी हे रुग्ण रांगा लावत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ताप आणि सर्दी असली तरी रुग्ण घाबरत आहेत. दरम्यान, डॉक्टरांनी रुग्णांना घाबरून न जाण्याचा सल्ला दिला आहे. आवश्यक वाटल्यास कोरोना चाचणी करण्याचादेखील सल्ला डॉक्टर देत आहेत. (cold and fever patients increases in vasai virar area)

Cold-fever-patient
साकिनाक्यात पादचाऱ्याला लुटलं; काही तासांतच तीन चोरटे गजाआड

काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्यात अवेळी पाऊसदेखील झाला; तर सकाळी काही प्रमाणात ऊनदेखील असते. या सततच्या वातावरण बदलामुळे नागरिकांमध्ये थंडी, ताप, खोकला, सर्दी असे आजार बळावू लागले आहेत. त्यामुळे सकाळी दवाखाना उघडण्यापूर्वी रुग्णांच्या तपासणीसाठी रांगा लागत आहेत. हवेतील बदलामुळे व्हायरल इन्फेक्शन होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. वसई, विरार, नालासोपारा व नायगाव भागात अशा आजाराने डोके वर काढले असल्याने कोरोना तर नाही ना, अशी भीती निर्माण झाली आहे.

त्यामुळे रक्ततपासणी व अन्य लक्षणांची माहिती घेतली जात आहे. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली असल्याने कामावर जाणाऱ्या, सार्वजनिक ठिकाणी बाजारहाट करणाऱ्या नागरिकांना आजाराचा सामना करावा लागत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दवाखान्यात तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांत सुमारे ८० टक्के रुग्ण हे ताप, सर्दी, खोकल्याचे आहेत. हे आजार हवामान बदलाच्या कारणाने होत असल्याने काही दिवसांत रुग्णांना उपचार घेतल्यावर बरे वाटते, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. सर्दी, ताप यामुळे अनेक रुग्णांना वाटते, की आपल्याला कोरोना झाला आहे. त्यामुळे ते घाबरून जात आहेत.

नागरिकांनी घाबरून न जाता डॉक्टर सांगतील तसे उपचार घ्यावेत. आवश्यक वाटल्यास चाचणीदेखील करावी. मागील वर्षापेक्षा हवामान बदलामुळे होणाऱ्या आजाराचे प्रमाण यंदा अधिक आहे. - डॉ. सुनील रणाईत, वसई

अशी घ्या काळजी

पाणी उकळून प्यावे. विनाकारण घराबाहेर पडू नये. तेलकट, आंबट, तिखट खाऊ नये. बाहेरचे खाद्यपदार्थ टाळावेत. मास्क परिधान करावे. वाफ घ्यावी. थंडीपासून बचाव करण्यासाठी ऊबदार कपडे घालावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com