रुग्णालयातच ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प

रुग्णालयातच ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प

रुग्णालयातच ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प राजमाता जिजाऊ रुग्णालय बनले स्वयंपूर्ण; गणेश नाईक यांच्या आमदारनिधीतून लोकार्पण वाशी, ता. १२ (बातमीदार) : ऐरोली, दिघा, रबाळे विभागातील नोड, गाव गावठाण, झोपडपट्टी परिसरातील नागरिक उपचारासाठी ऐरोली सेक्टर ३ येथील नवी मुंबई महापालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयात येतात. या रुग्णालयात आता वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याची कायमस्वरूपी सोय निर्माण झाली आहे. आमदार गणेश नाईक यांच्या एक कोटी रुपयांच्या आमदारनिधीतून रुग्णालयातच ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प स्थापन करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे बुधवारी (ता. १२) आमदार नाईक यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. त्यामुळे राजमाता जिजाऊ रुग्णालय आता ऑक्सिजन पुरवठ्यात स्वयंपूर्ण बनले आहे. आमदार निधी आणि महापालिकेच्या काही निधीमधून पीएसए तंत्रज्ञानावर आधारित १००० एलपीएम क्षमतेचा हा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभा राहिला आहे. दररोज २०० जम्बो सिलेंडर भरता येतील एवढी ऑक्सिजन निर्मिती या प्लांटमधून होणार आहे. प्रतिदिन २०० ते २०५ रुग्णांना वैद्यकीय प्राणवायू पुरवता येणार आहे. राजमाता जिजाऊ रुग्णालयात २०० खाटांचा अतिदक्षता विभाग आहे. या अतिदक्षता विभागातील रुग्णांना या प्लांटमधून ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. ऐरोली, रबाळे, दिघा आणि परिसरातील सर्वसामान्य रुग्णांची वैद्यकीय ऑक्सिजनसाठी होणारी धावाधाव यामुळे थांबणार आहे. परिणामी, केवळ कोविड काळातच नव्हे, तर ऑक्सिजन पुरवठ्याची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध झाली आहे. कोरोना नियमांचे काटेकोर पालन करत पार पडलेल्या या कार्यक्रमाला ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी सभापती अनंत सुतार, माजी सभागृहनेते रवींद्र इथापे, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी सभापती डॉ. जयाजी नाथ, माजी नगरसेवक अशोक पाटील, माजी परिवहन समिती सभापती अ‍ॅड. जब्बार खान, पालिकेचे शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे उपस्थित होते. --------------------------------------------------------------- नवी मुंबईची जनता सुजाण आहे. १९९५ पासून ती माझ्या विचारांसोबत आहे. नवी मुंबईचा विकास करण्याची शक्ती जनतेनेच दिली आहे. साडेचार लाख लोकसंख्या असताना आणि आता १५ लाख लोकसंख्या झाल्यावरही जनता आमच्यासोबतच आहे. भविष्यातही नवी मुंबईची जनता सोबतच राहणार आहे. - गणेश नाईक, आमदार, ऐरोली विधानसभा --------------------------------------------------------------- सुरक्षिततेची काळजी घ्या ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पाच्या सुरक्षेची काटेकोर काळजी घेण्याची सूचना आमदार गणेश नाईक यांनी पालिका व रुग्णालय प्रशासनाला केली आहे. राज्यात ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पात दुर्घटना घडल्या आहेत. अशा अप्रिय घटना टाळण्यासाठी पालिकेचा आरोग्य विभाग आणि स्थापत्य विभागाने समन्वयाने काम करावे. एकमेकांवर जबाबदारी झटकू नये, असे सूचित केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com