Sports
Sportssakal media

जिम्नॅस्टिक स्पर्धेत ठाण्यातील खेळाडूंची गरुडझेप

जिम्नॅस्टिक स्पर्धेत ठाण्यातील खेळाडू चमकले महाराष्ट्राच्या संघात, सहा जणांनी पटकावले स्थान

ठाणे : पिंपरी चिंचवड येथे पार पडलेल्या ५५ व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत ठाण्यातील सरस्वती क्रीडा संकुलाच्या जिम्नॅस्ट्सनी अप्रतिम कौशल्याच्या जोरावर पदकांची लयलूट केली आहे. स्पर्धेत ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना खेळाडूंनी १३ सुवर्ण, १४ रौप्य आणि चार कांस्यपदकांसह एकूण ३१ पदकांची कमाई केली. सरस्वती क्रीडा संकुलाच्या सहा जिम्नॅस्ट्सनी आगामी राष्ट्रीय अजिंक्यपद आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवले. (Thane gymnastic players wins thirteen gold medals)

यामध्ये साक्षी दळवी, अनन्या शेट्टी, क्रिशा जतिन शाह, प्रसन्न कुचेकर, समिरन जोशी आणि प्रिन्स जैन यांचा समावेश आहे. सरस्वती क्रीडा संकुलात प्रशिक्षण घेणाऱ्या १२ वर्ष वयोगटात अनन्याने ऑलराऊंड, बॅलन्सिंग बीम, फ्लोअर एक्सरसाईज आणि सांघिक सुवर्णपदकांसह अनइव्हन बार प्रकारात रौप्यपदक जिंकत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली दावेदारी पक्की केली; तर क्रिशा शाहने राज्याच्या संघात जागा मिळवताना सांघिक सुवर्णपदकासह ऑलराऊंड आणि बॅलेन्सिंग बीम प्रकारात रौप्यपदक; तर अनइव्हन बार प्रकारात कांस्यपदक जिंकले. १२ वयोगटातील मुलांमध्ये प्रसन्न कुचेकरने रोमन रिंग, टेबल व्हॉल्ट आणि हायबार मध्ये सुवर्ण पदक जिंकून ऑलराऊंड आणि सांघिक रौप्यपदकाचाही मानकरी ठरला.

समिरनने पॅरलल बार प्रकारात सुवर्णपदक जिंकले; तर समिरन जोशी ही पॉमेल हॉर्स आणि सांघिक प्रकारात रौप्य, ऑलराऊंड आणि फ्लोअर एक्सरसाईज प्रकारात कांस्यपदकाचा मानकरी ठरला आणि श्रीराज जगदाळेला सांघिक रौप्यपदक मिळाले. प्रिन्सने हॉरिझाँटल बारसह पॉमेलहॉर्स प्रकारात सुवर्ण; तर ऑलराऊंड, रोमन रिंग्ज आणि सांघिक रौप्यपदकाचा कमाई केली. स्पर्धेत हार्दिक आंबेकर आणि आर्यन कोळेकर सांघिक रौप्यपदकाचे विजेते ठरले. मुलींच्या १० वर्ष गटात साक्षीने ऑलराऊंड आणि फ्लोअर एक्सरसाईज प्रकारातील सुवर्णपदकासह बॅलन्सिंग बीम प्रकारात रौप्यपदक जिंकले.

या पदकविजेत्यांना महेंद्र बाभुळकर यांच्यासह प्रणाली मांडवकर आणि अद्वैत वायंगणकर यांचे मार्गदर्शन मिळाले. ठाणे जिल्हा क्रीडाधिकारी स्नेहल साळुंखे, सरस्वती क्रीडा संकुलाचे व्यवस्थापक दीपक सहानी यांनी पदकविजेत्यांचे अभिनंदन करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

कोरोना महामारीमुळे मुलांना बाहेर सराव करता आला नसला, तरी त्यांनी ऑनलाईन पद्धतीने सराव सुरू ठेवला होता. त्यामुळे लॉकडाऊननंतर प्रत्यक्षात सराव करताना मुलांना त्रास जाणवला नाही. मुलांच्या या मेहनतीचे फळ त्यांना राज्य स्पर्धेत मिळाले.

- महेंद्र बाभुळकर, मुख्य प्रशिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com