मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर अपघात

मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर अपघात

एक्स्प्रेस-वेवर अपघातात रिक्षा चालकासह दोघे ठार पनवेल, ता. १३ (वार्ताहर) : मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर कळंबोलीजवळ अज्ञात वाहनाने रिक्षाला समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षा चालकासह प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. बेजबाबदारपणा वाहन चालवल्याप्रकरणी रिक्षाचालकाविरोधात खांदेश्‍वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रिक्षाचालक अप्पू शेखप्पा अलूर (वय ५३) हा मुंबईतील विलेपार्ले येथील संभाजीनगरमध्ये राहण्यास होता. दुसऱ्या मृत प्रवाशाची ओळख पटलेली नाही. हे दोघे बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एक्स्प्रेस मार्गावर रिक्षा घेऊन गेले होते. कळंबोली सर्कलपासून अंदाजे दीड किमी अंतरावर मुंबई मार्गिकेवर रिक्षाला अज्ञात वाहनाने समोरून धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच खांदेश्वर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोघांचे मृतदेह पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर दुचाकी व तीन चाकी वाहन घेऊन जाण्यास बंदी आहे. अप्पू अलूर याने रिक्षा एक्स्प्रेस मार्गावर नेली. मात्र रिक्षा अलूर याने एक्स्प्रेस मार्गावर कुठून रिक्षा नेली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांकडून सीसी टीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. या अपघाताला मृत रिक्षा चालकाला जबाबदार धरून खांदेश्वर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चौकट अलूर याने कळंबोली सर्कल येथून राँग साईडने रिक्षा एक्स्प्रेस मार्गावर नेली असावी, अथवा पनवेलमधील शेडुंग टोल नाका येथून त्यांनी एक्स्प्रेस मार्गावरील मुंबई मार्गिकेवर रिक्षा आणली असावी, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com