नवीन रेंज रोव्‍हरसाठी भारतात बुकिंग सुरू

नवीन रेंज रोव्‍हरसाठी भारतात बुकिंग सुरू

नवीन रेंज रोव्‍हरसाठी भारतात बुकिंग सुरू मुंबई, ता. १३ : लँड रोव्हर इंडियाने त्यांची फिप्थ जनरेशन रेंज रोव्हर या लक्झरियस एसयूव्हीच्या बुकिंगला सुरुवात केली आहे. या कारची प्रारंभी किंमत दोन कोटी ३१ लाख ९१ हजार इतकी आहे. नवीन रेंज रोव्हर ३.० लिटर डिझेल, ३.० लिटर पेट्रोल आणि नवीन ४.४ लिटर पेट्रोल आदी इंजिन प्रकारात उपलब्ध असणार आहे. या कारमध्ये नवीन ४.४ लिटर ट्विन टर्बो व्‍ही-८ पेट्रोल इंजिन दिले असून, ती ०-१०० किलोमीटर प्रतितास वेग ४.६ सेकंदांमध्‍ये प्राप्त करते. रेंज रोव्‍हर भारतातील लक्‍झरी एसयूव्‍ही कारच्‍या अग्रस्‍थानी आहे. ही नवीन फिप्थ जनरेशन रेंज रोव्‍हर अधिक आकर्षक असून, लक्झरीयस एसयूव्‍हीच्‍या प्रत्‍येक पैलूला परिभाषित करते, असे जग्‍वार लॅण्‍ड रोव्‍हर इंडियाचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक रोहित सुरी म्‍हणाले. या कारमध्ये चार, पाच तसेच सात जणांच्या आसनाचे पर्याय देण्यात आले आहेत. तसेच या कारमध्ये केबिन एअर प्‍युरिफिकेशन प्रोमध्‍ये पीएम २.५ फिल्‍ट्रेशन व नॅनो एक्‍स तंत्रज्ञान दिले असून, जे दुर्गंधी, जीवाणू, विषाणू व एलर्जी लक्षणीयरित्‍या कमी करण्‍यामध्‍ये मदत करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com