कोरोना नियम मोडल्यास उठाबशांची शिक्षा; वसई-विरार पालिका आक्रमक | corona | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vasai Virar
कोरोना नियम मोडल्यास उठाबशांची शिक्षा

कोरोना नियम मोडल्यास उठाबशांची शिक्षा; वसई-विरार पालिका आक्रमक

sakal_logo
By

वसई : वसई-विरारमध्ये (vasai-virar) कोरोना संसर्गाला (corona patients) रोखण्यासाठी पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी कोरोना नियमांना पायदळी तुडवणाऱ्या (corona rules) नागरिकांना उठाबशा काढण्याची शिक्षा महापालिकेतर्फे देण्यात येत आहे. त्यामुळे यापुढे मास्कविना फिरल्यास सावधान राहा, असा इशाराच जणू प्रशासनाने दिला आहे. (Vasai virar municipal corporation gives punishment after breaking corona rules)

हेही वाचा: बदलत्या वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम; संसर्गजन्य आजारात वाढ

वसई-विरार शहरात ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे असणाऱ्या नागरिकांची संख्यादेखील वाढत असल्याने प्रशासनाने सतर्कता बाळगण्यासाठी नऊ प्रभागांत पथके तयार केली आहेत. विनामास्क आढळणाऱ्या नागरिकांना २०० रुपये दंड आकारला जात असून, जे दंड भरू शकत नाहीत त्यांची सुटका न करता सार्वजनिक ठिकाणी उठाबशा काढून घेतल्या जात आहेत. या वेळी पालिका पथकासोबत नागरिकांची तू तू मैं मैं देखील होत आहे.

पालिका हद्दीत गेल्या तीन दिवसांत दोन हजार ६७७ बाधित आढळून आले; तर ११ जणांचा बळी गेला आहे; तर सात हजार ८९० रुग्ण उपचार घेत आहेत. बाधितांची संख्या रोखण्यासाठी पालिकेकडून दक्षता घेतली जात असली, तरी अनेक ठिकाणी नागरिक नियमांचे उल्लंघन करत आहेत. शहरातील भाजी मंडई, रेल्वे स्थानक, रिक्षा स्टँड, मॉल आदी ठिकाणी मोठी गर्दी होते, परंतु अनेक नागरिकांच्या तोंडावर मास्क नसतो. सार्वजनिक वाहनांमध्येही नागरिक विनामास्क फिरत असतात.

त्यामुळे अशा नागरिकांवर पालिका व पोलिस प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. पालिका क्षेत्रात विनामास्क फिरू नये, असे आवाहन वेळोवेळी केले जाते. तरी काही नागरिक याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. आरोग्याची आपणच काळजी घेण्यासाठी पुढे आले पाहिजे. तरच कोरोनाशी लढा देता येणार आहे. - अजिंक्य बगाडे, अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार महापालिका.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top