infectious disease
infectious diseasesakal media

बदलत्या वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम; संसर्गजन्य आजारात वाढ

सरकारीपेक्षा खासगी रुग्णालयांत गर्दी
Published on

उरण : सततच्या वातावरणातील बदलांमध्ये उरणमध्ये (uran) ताप, सर्दी, खोकला या संसर्गजन्य रोगांमध्ये (infectious disease patients) वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे उपचारासाठी सरकारीपेक्षा खासगी रुग्णालयांमध्ये नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. वातावरणात सततचा बदल होऊ लागला आहे. कधी कडक ऊन, तर कधी पाऊस पडतो. गेले तीन दिवस तर थंडीने कहर केला आहे. त्यामुळे हवेत भर दुपारीही गारवा असतो. सकाळी धुकेही पडलेले असतात. (Infectious disease patients increases in uran due to climate change)

 infectious disease
मुंबईत नव्या रुग्णसंख्येत किंचीत घसरण; ६ जणांचा मृत्यू

या बदलत्या वातावरणामुळे उरण तालुक्यातील नागरिकांना सर्दी, खोकला, ताप अशा आजारांनी ग्रासले आहे. त्यात नवीन कोरोना ओमिक्रॉन या रोगाने डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिक भीतीच्या सावटाखाली असल्याने आजारी पडल्यास उपचारासाठी फॅमिली डॉक्टरकडे जाणे पसंत करत आहेत. उरणमध्ये तसे पाहता कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आहे.

दिवसभरात साधारण ६० ते ७० रुग्ण उपचारासाठी येतात. उर्वरित जवळील खासगी दवाखान्यांत जात आहेत. परंतु ज्या रुग्णांना सर्दी किंवा ताप, खोकला आहे, अशा रुग्णांनी स्वतः वेगळे राहिले पाहिजे. तसेच आपली चाचणी केली पाहिजे. पाणीही गरम करूनच प्यायले पाहिजे. - राजेंद्र इतकरे, आरोग्य अधिकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com