कल्याण : ४० हजार लीटर गावठी दारुचा साठा नष्ट | kalyan news update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Excise department

कल्याण : ४० हजार लीटर गावठी दारुचा साठा नष्ट

sakal_logo
By

डोंबिवली : ताडीचे सेवन केल्याने डोंबिवलीत दोघांचा मृत्यू (dombivali) झाल्याची घटना घडताच कल्याण ग्रामीण भागात राज्य उत्पादन शुल्क विभाग (excise department) सतर्क झाला आहे. ग्रामीण परिसरातील गावठी दारू निर्मिती (Desi alcohol production ) केंद्रांचा शोध घेत ते नष्ट करण्याकडे विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. द्वारली, माणेरे गावात धाडी टाकत राज्य उत्पादन शुल्क विभागाने नऊ लाख रुपये किमतीचा ४० हजार ५०० लिटर दारूसाठा नष्ट केला आहे. (Maharashtra excise department action against desi alcohol production in Kalyan rural area)

हेही वाचा: बदलत्या वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम; संसर्गजन्य आजारात वाढ

ग्रामीण भागात सर्रासपणे दारू, ताडी निर्मिती करून शहरात राजरोसपणे विक्री केली जाते. त्यावर कोणाचाही वचक नसल्याचे दिसते. राज्य उत्पादन शुल्क विभाग, ठाणे यांना मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ विभागीय पोलिस निरीक्षक एस. एन. घुले, कल्याण अंबरनाथ विभागाचे उप निरीक्षक मालवे, दुय्यम निरीक्षक आर. आर. चोरट यांच्या पथकाने बुधवारी अंबरनाथ तालुक्यातील द्वारली, माणेरे गावात कारवाई केली. येथील नवसागर मिश्रित रसायनाने भरलेले ड्रम उद्‍ध्‍वस्त केले. या वेळी ४० हजार ५०० लिटर रसायनाचा साठा, अन्य साहित्य असा एकूण नऊ लाख २९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

सखोल चौकशीची मागणी ताडीच्या अतिसेवनामुळे डोंबिवलीतील स्वप्नील आणि सचिन या तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र रसायन मिश्रित ताडी पिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा स्वप्नील याचा भाऊ सिद्धार्थ चोळके याने केला आहे. विष्णूनगर पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन त्यांनी पोलिसांना दिले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Crime Newskalyan
loading image
go to top