कळंबोली मॅकडोनाल्डला कोरोना संसर्ग

कळंबोली मॅकडोनाल्डला कोरोना संसर्ग

कळंबोली मॅक्डोनल्ड हॉटेल सील दहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह वसंत जाधव : सकाळ वृत्तसेवा नवीन पनवेल, ता. १४ : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत असलेल्या कळंबोली मॅक्डोनल्डमधील १० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे हा परिसर कंटेन्मेंट म्हणून महापालिकेने घोषित करून मॅक्डोनल्ड हॉटेल सील केले आहे. या परिसरात प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पनवेल हे मुंबईचे प्रवेशद्वार असल्याने येथून येणा-जाणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. कळंबोली येथून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग सुरू होतो. त्यामुळे मुंबई, पुण्याकडून ये-जा करणारे अनेक जण कळंबोली मॅक्डोनल्ड हॉटेलमध्ये अल्पोपाहारासाठी थांबतात. अशातच हॉटेलमधील १० कर्मचाऱ्यांचा कोविड- १९ अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर पनवेल महानगरपालिका खडबडून जागी झाली असून कळंबोली मॅक्डोनल्डला कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. हे हॉटेल सील करण्यात आले असून या ठिकाणी अन्नपदार्थ विक्री बंद करण्यात आली आहे. त्या आशयाचा फलक पनवेल महानगरपालिकेकडून लावण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काही दिवस मॅक्डोनल्ड बंद राहणार आहे. चौकट मॅक्डोनल्ड कोरोनाचे संक्रमक मॅक्डोनल्ड हॉटेलमध्ये शेकडो लोक अल्पोपाहार करण्यासाठी येतात. त्याचबरोबर येथून पार्सलसुद्धा नेले जाते. मॅक्डोनल्डमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. त्यामुळे येथे आलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. त्यांचा शोध घेणे पालिका प्रशासनाला अत्यंत अवघड होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com