संक्रमण शिबिरातील घुसखोरांच्या पात्रता निकषांबाबत संदिग्धता

संक्रमण शिबिरातील घुसखोरांच्या पात्रता निकषांबाबत संदिग्धता

संक्रमण शिबिरातील घुसखोरांच्या पात्रता निकषांबाबत संदिग्धता स्पष्ट सूचना देण्याची म्हाडाची गृहनिर्माण विभागाला मागणी सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १४ : म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील घुसखोरांना पात्र करण्याबाबत गृहनिर्माण विभागाने शासन निर्णय जारी केला आहे; मात्र यामध्ये घुसखोरांना कोणत्या तारखेपासून पात्र समजण्यात यावे याबाबत निश्चित कालावधी नमूद करण्यात आलेला नाही. त्यामुळे घुसखोरांना पात्र करण्याबाबत निर्णय घेणे अडचणीचे ठरणार असल्याने पात्रतेबाबत स्पष्ट सूचना जारी कराव्यात, असे पत्र मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने गृहनिर्माण विभागाला पाठवले आहे. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाची शहर आणि उपनगरात संक्रमण शिबिरे आहेत. या शिबिरांमध्ये सुमारे ९ हजार जणांनी घुसखोरी केल्याचे म्हाडाने केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. या घुसखोरांना संक्रमण शिबिरातून बाहेर काढण्याचे म्हाडाने वारंवार प्रयत्न केले; मात्र त्यात यश आले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून घुसखोर म्हाडाला कोणतेही भाडे न भरता राहत आहेत. तसेच या खोल्यांवर ते मालकीहक्क सांगत असल्याने म्हाडाने दोन वर्षांपूर्वी घुसखोरांबाबत एक धोरण तयार करून तसा प्रस्ताव मान्यतेसाठी सरकारकडे पाठवला होता. त्यानुसार गृहनिर्माण विभागाने १३ सप्टेंबर २०१९ रोजी शासन निर्णय जारी करत घुसखोरांना संरक्षण दिले आहे; मात्र या निर्णयामध्ये घुसखोरांना पात्र करण्याबाबत निश्चित कलावधी नमूद करण्यात आलेला नाही. त्यामुळे घुसखोरांना पात्र ठरवताना अधिकाऱ्यांपुढे पेच निर्माण झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com