१५ हजारांचा आरोग्य विमा

१५ हजारांचा आरोग्य विमा

१५ हजारांचा आरोग्य विमा पालिका कर्मचाऱ्यांना २०१७ पासूनचे अनुदान मिळणार सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १४ : आरोग्य विम्यापोटी वार्षिक १२ हजार रुपयांच्या अनुदानाऐवजी १५ हजार रुपयांचे अनुदान देण्याचा ठराव आज पुन्हा महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. २०१७ पासून पूर्वलक्षी प्रभावाने हे अनुदान मिळणार आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली. पालिका कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या गटविमा योजना बंद झाल्यावर महापालिकेने कर्मचाऱ्यांना आरोग्य विमापोटी १२ हजार रुपये अनुदान म्हणून देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी स्थायी समितीत मांडला होता; मात्र किमान १५ हजार रुपयांचे अनुदान मिळण्याची मागणी करत शिवसेनेने तसा ठरावही तेव्हा स्थायी समितीत मंजूर केला होता. त्यानंतरही प्रशासनाने पुन्हा १२ हजार रुपयांचे अनुदान मिळण्याचा ठराव आजच्या बैठकीत मांडला होता. या प्रस्तावावर सदस्यांनी आक्षेप घेतला. सर्व कामगार संघटनांनी या निर्णयाला मान्यता दिली असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे; मात्र कोणत्या कामगार संघटनांनी मंजुरी दिली याची माहिती नाही, असे यशवंत जाधव यांनी सांगितले. त्यामुळे १५ हजार रुपयांचे अनुदान मिळावे हा ठराव करण्यात आला असून आता त्यानुसारच अनुदान मिळणार आहे. तसेच गटविमा योजना २०१७ पासून बंद आहे. त्यामुळे पूर्वलक्षी प्रभावाने हे अनुदान मिळणार आहे, असा दावाही जाधव यांनी केला. ----- गटविमाच हवा! कर्मचाऱ्यांना १५ हजारांत जो आरोग्य विमा मिळेल, त्यात कोणत्याही मोठ्या रुग्णालयात उपचार करता येणार नाहीत. मोठ्या आजारांचेही उपचार होणे अवघड आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच गटविमा योजना लागू करावी, अशी भूमिका भाजपचे सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी मांडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com