आधीच थंडी, त्यात वाढता थंडावा
हार्बर रेल्वेवर आता १६ एसी लोकल फेऱ्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : हार्बर रेल्वेवरील सीएसएमटी ते वाशी/पनवेल आणि वांद्रे/गोरेगाव स्थानकांदरम्यान आता १२ ऐवजी १६ एसी लोकल सेवा शनिवारपासून (ता.१५) सुरू होणार आहेत; तर काही एसी लोकल सेवा सुट्टीच्या दिवशी आणि रविवार ‘नॉन एसी’ लोकल सेवा म्हणून चालवल्या जातील.
मध्य रेल्वेच्या ताफ्यात सर्वप्रथम एसी लोकल जानेवारी २०२० रोजी ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल दरम्यान धावण्यास सुरुवात झाली. त्यानंतर मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते कल्याण दरम्यान, डिसेंबर २०२० पासून दुसरी एसी लोकल सुरू केली. मध्य रेल्वेने साध्या लोकलच्या फेऱ्या रद्द करून त्याऐवजी एसी लोकल चालविण्यास सुरुवात केली. मात्र, एसी लोकलच्या जादा तिकीट दरामुळे प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरवली. सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द केल्याने या वेळेतील इतर उपनगरी गाड्यांच्या प्रवासी संख्येत भर पडली. ट्रान्सहार्बर मार्गावर धावणाऱ्या १६ एसी उपनगरी रेल्वेगाड्यांना प्रवाशांचा अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने या एसी गाड्यांचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला. सध्या सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगाव आणि वाशी/पनवेल स्थानकादरम्यान १२ एसी लोकल सेवा सुरू केल्या होत्या. मात्र, आता आणखी चार एसी लोकल वाढविण्यात आल्या आहेत.
...
वेळापत्रक
- वाशी पहाटे ५.२७ सीएसएमटी सकाळी ६.१६
- सीएसएमटी सकाळी ६.२४, पनवेल सकाळी ७.४४
- पनवेल सकाळी ७.५५ , वडाळाला रोड सकाळी ८.५६
- वडाळा रोड ९.८ , पनवेल सकाळी १०.१०
- पनवेल सकाळी १०.१७, सीएसएमटी सकाळी ११.३६
- सीएसएमटी सकाळी ११.४०, पनवेल दुपारी १.०१
- पनवेल दुपारी १.०९ सीएसएमटी दु. २.२८
- सीएसएमटी दु. २.३४ , पनवेल दु. ३.५४
- पनवेल सायंकाळी ४.०१, सीएसएमटी सायं. ५.२०
- सीएसएमटी सायं. ५.२६ वाशी सायं.६.१६
- वाशी सायं. ६.२६, सीएसएमटी सायं.७ .१७
- सीएसएमटी सायं. ७.२४ वांद्रे सायं. ७.५४
- वांद्रे रात्री ८.०२. सीएसएमटी रात्री ८.३२
- सीएसएमटी रात्री ८.३६, गोरेगाव रात्री ९.३२
- गोरेगाव रात्री ९.४३ , सीएसएमटी रात्री १०.३८
- सीएसएमटी रात्री १०.४५. वाशी रात्री ११.३४
...
पश्चिम रेल्वे
१,३७५ एकूण फेऱ्या
यांपैकी १६ एसी लोकलच्या फेऱ्या
मध्य रेल्वे
१,७७४ एकूण फेऱ्या
आठ एसी लोकल फेऱ्या
हार्बर रेल्वे
६१४ एकूण फेऱ्या
यांपैकी १६ हार्बर मार्गावर एसी लोकल
...