१०० टक्के गुन्हेगारांना झाली शिक्षा

१०० टक्के गुन्हेगारांना झाली शिक्षा

१०० टक्के गुन्ह्यांची उकल मुंबई जीआरपीचा नवा विक्रम रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १५ : मुंबई जीआरपी, म्हणजेच मुंबई रेल्वे पोलिसांनी १०० टक्के गुन्ह्यांची उकल करून त्यांना शिक्षा झाल्याचा नवा विक्रम स्थापित केला आहे. गेल्या वर्षभरात जीआरपीकडे दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांची उकल करण्यात जीआरपीला यश आले आहे, तसेच गुन्हेगारांना शिक्षाही मिळाली आहे. २०२१ मध्ये मुंबईच्या सीएसटी ते पनवेल-कसारा- कर्जत आणि चर्चगेट ते पालघर अशा सर्व मार्गिकेवर एकूण ३,०५२ गुन्हे दाखल झाले होते. यातील २,१९७ गुन्हे न्यायालयाबाहेर निकाली काढण्यात आले, तर राहिलेल्या ८५५ गुन्ह्यांचे खटले पूर्ण झाले आहेत. त्यातल्या ७४५ गुन्हेगारांना शिक्षा झाली आहे, तर उर्वरित ११० दोषी आढळून आल्याने त्यांना लवकरच शिक्षा सुनावण्यात येणार आहे. चौकट सर्वाधिक गुन्हे होणारी रेल्वेस्थानके सीएसटी, दादर, कुर्ला, वांद्रा अशी टर्मिनस असलेली आणि सतत गर्दी असलेल्या स्थानकांवर सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली असल्याचे जीआरपीच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. गेल्या वर्षभरात कुर्ला स्थानकावर सर्वाधिक म्हणजे ३३७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर कल्याण रेल्वेस्थानकात २७५, तर वडाळा स्थानकात २४३ गुन्ह्यांची नोंद आहे. पालघर स्थानकावर सर्वात कमी म्हणजेच ३६ गुन्ह्यांची नोंद आहे. त्यानंतर कर्जत स्थानकात ४५, तर पनवेल स्थानकात ४६ गुन्ह्यांची नोंद आहे. गुन्हे सोडवण्यासाठी प्रशिक्षण गुन्ह्यांची उकल करण्यासाठी, लवकरात लवकर आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी रेल्वे पोलिसांना रेल्वे पोलिस आयुक्त आयुक्त कैसर खालीद सतत मार्गदर्शन करत असतात. गुन्हेगार कशा पद्धतीनं विचार करतात याचा अभ्यास, तसेच सराईत गुन्हेगार गुन्हा घडल्यानंतर कसा वागतो याचा अभ्यास करणे, असे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण पोलिस कर्मचाऱ्यांना आम्ही सतत देत असतो, त्यामुळे कोणताही गुन्हा सोडवण्यात आणि गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यात मदत होते, अशी माहिती रेल्वे पोलिस उपायुक्त सचिन कदम यांनी दिली. कोट अनेकदा पकडला गेलेला गुन्हेगार हा सराईत गुन्हेगार नसतो, तेव्हा असा एखादा गुन्हेगार पकडला गेल्यानंतर तो जोपर्यंत पोलिसांच्या ताब्यात असतो, तोपर्यंत आम्ही त्याचं समुपदेशन करतो, जेणेकरून शिक्षा झाली तर ती भोगून बाहेर आल्यानंतर पुन्हा गुन्हेगारीकडे वळणार नाही. - सचिन कदम, रेल्वे पोलिस उपायुक्त.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com