covid
covid

सहव्याधींग्रस्तांनो सावधान! ओमिक्रॉनसंदर्भात तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा इशारा

Summary

सहव्याधींग्रस्तांनो सावधान! ओमिक्रॉनला सौम्य न समजण्याची तज्ज्ञांचा सल्ला

मुंबई : कोविडची तिसरी लाट (corona third wave) ही ओमिक्रॉनची असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासह ओमिक्रॉनचा संसर्ग (omicron infection) सौम्य स्वरूपाचा आहे, असेही सांगितले जात आहे. मात्र सहव्याधी असलेल्या किंवा गंभीर रुग्णांच्या तो जीवावर बेतू शकतो, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या लाटेत बहुतांश रुग्ण सहव्याधीचे असून त्यांच्या उपचारांसाठी जास्तीत जास्त कालावधी लागत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. (So many patients are from symptomatic disease in omicron infection)

covid
'ओमिक्रॉन की डेल्टा' तुम्हाला कोणत्या व्हेरियंटचा संसर्ग झालाय? कसं समजेल?

मुंबईच्या पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात ओमिक्रॉनसह कोविड रुग्णांवर उपचार केले जात आहेत. सर्वाधिक ओमिक्रॉनच्या रुग्णांवर याच रुग्णालयात उपचार करण्यात आले. सध्या कोविडचे ६९५ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. त्यापैकी १८८ रुग्ण आयसीयूमध्ये आहे. ५५० रुग्णांमध्ये सौम्य ते मध्यम लक्षणे आहेत. यांचा रिकव्हरी दर चांगला असून सरासरी ४ ते ७ दिवसांत बरे होऊन घरी जातात. पण सेव्हन रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्‍या रुग्णांचा बरा होण्याचा कालावधी जास्त आहे, असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. बाळकृष्ण अडसूळ यांनी सांगितले.

covid
लक्षणे सौम्य असूनही ओमिक्रॉन इतक्या वेगाने का पसरतोय? जाणून घ्या

सध्या जे रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत ते दुसऱ्या उपनगरीय रुग्णालयांतून किंवा खासगी रुग्णालयाच्या आयसीयूतच उपचार घेत होते. त्यांचे वय सरासरी ७० वर्षे आहे. शिवाय इतरही सहव्याधी असल्याने ते याआधीही एनआयव्ही, व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. याशिवाय ज्यांच्या शस्त्रक्रिया करायच्या होत्या, पण शस्त्रक्रियेपूर्वी केलेल्या कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आल्या, त्यांना सेव्हन हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातून ७ ते ८ दिवसांत आयसीयूमध्ये दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे.

१५ ते २० टक्के

ऑक्सिजन रुग्णालयात दाखल असलेल्या जवळपास ७० ते ८० रुग्णांनाच ऑक्सिजनची गरज लागत आहे. दररोज १५ ते २० टक्के ऑक्सिजन लागतो. तर दुसऱ्या लाटेत ४० ते ५० टक्के ऑक्सिजन लागत होता. त्यावेळेस मृत्युदरही जास्त होता.

९० टक्के सौम्य रुग्ण

डाॅ. अडसूळ यांच्या निरीक्षणानुसार, ९० टक्के रुग्ण हे सौम्य लक्षण असलेले आहेत. तसेच ४ ते ७ दिवसांत ते बरे होतात. जे सहव्याधी रुग्ण येतात त्यांनी जास्त काळजी घ्यायची गरज आहे. त्यातील १० ते १५ टक्के रुग्णांमध्ये ऑक्सिजनही लागतो. त्यामुळेच सहव्याधी रुग्णांसह ज्येष्ठ नागरिकांनी ओमिक्रॉन किंवा कोविडला हलक्यात घेऊ नये.

ओमिक्रॉनला सौम्य समजणे चुकीचे

ओमिक्रॉनला सौम्य समजणे हे चुकीचे ठरेल. काही विशिष्ट श्रेणीतील नागरिकांनी जसे की, सहव्याधीग्रस्त रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांचे वेगवेगळे उपचार आणि औषधे सुरू आहेत अशांनी ओमिक्रॉनला अजिबातच सौम्य समजू नये, वैद्यकीय सल्ल्यानुसार परिस्थितीप्रमाणे रुग्णालयात दाखल व्हावे, सौम्य लक्षणे आहेत म्हणून उपचार टाळू नयेत, असा सल्ला कोविड टास्क फोर्सचे सदस्य डाॅ. शशांक जोशी यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com