Balasaheb Thorat
Balasaheb Thoratesakal

पुरोगामी विचार रूजविण्याचे संतांचे कार्य : थोरात

अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाचे शानदार उद्‍घाटन

खोपोली : महाराष्ट्र राज्याचा धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिकसह ज्ञानाचा पाया (Educational knowledge) वारकरी संप्रदाय व संतांनी मजबूत केला. येथील माणसांच्या नसानसांत पुरोगामी विचारांचे बीज संतांनी (Saint) रुजवले असून, नवीन पिढीला आदर्श जीवनासह यशस्वी आयुष्यासाठी दिशादर्शक बनण्याचे कार्य वारकरी संप्रदाय, विद्यमान कीर्तनकार व संतांनी करण्याची विनंती राज्याचे मंत्री महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली. दहाव्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाचे उद्‍घाटन शनिवारी दिमाखात संपन्न झाले.

Balasaheb Thorat
BMC : युती न झाल्यास ''सहकार्या''चा फॉर्म्युला

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात देवन्हावे येथील नोव्हाटेंन इमॅजिका रिसॉर्टच्या सभागृहात हे दोन दिवसीय संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्‍घाटन महसूल मंत्री थोरात यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. राष्ट्रीय नुकसान करणारे समाजविघातक विचारांचा नायनाट होण्यासाठी व समाजात वाढत असलेल्या नथुराम गोडसे प्रवृत्तीला चोपून काढण्यासाठी संतांनी स्पष्टपणे पुढे येऊन भूमिका घेण्याचे आवाहन थोरात यांनी केले.

या संमेलनाचे अध्यक्ष हभप बाळासाहेब महाराज देहूकर यांनी बोलताना वारकरी संप्रदायाचा इतिहास, परंपरा व वर्तमान वाटचालीबाबत माहिती दिली. वारकरी संप्रदायामधील सर्वोत्तम धर्म समाजकार्य करणाऱ्या वारकऱ्याला देश पातळीवरचा पद्य पुरस्कार देण्याची मागणी केली. यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा अशी विनंती केली. या वेळी वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हभप विठ्ठल पाटील, सचिव डॉ. सदानंद मोरे, राज्य कार्यकारिणीचे सदस्य, आमदार महेंद्र थोरवे, रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, तहसीलदार आयुब तांबोळी व राज्यातील वारकरी संप्रदायाचे प्रमुख कीर्तनकार, अभ्यासक उपस्थित होते. प्रास्ताविक परिषदेचे अध्यक्ष हभप विठ्ठल महाराज पाटील यांनी केले. कमीत कमी संख्येत कोरोना नियमांचे पालन करून हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

चौकट उद्या समारोप सकाळी भव्य ग्रंथदिंडी, पालखी काढण्यात आली. महसूल मंत्री थोरात, आमदार थोरवे यांनी या दिंडीचे स्वागत केले. दोन दिवसीय या संत साहित्य संमेलनात साधू-संत परंपरा, वारकरी संप्रदाय महिलांचे योगदान, तरुण पिढी व वारकरी संप्रदाय, संत नामदेवांचे वारकरी संप्रदायमधील महत्त्व आदी विषयांवर चर्चासत्र ठेवण्यात आले आहेत. उद्या (ता. २३) प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री आदिती तटकरे, माजी आमदार सुरेश लाड यांच्या उपस्थितीत या संमेलनाचा समारोप होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com