वादळी वाऱ्यामुळे मासेमारी नौका फुटल्या, उत्तनमधील नौकांचे लाखोंचे नुकसान

वादळी वाऱ्यामुळे मासेमारी नौका फुटल्या, उत्तनमधील नौकांचे लाखोंचे नुकसान

वादळी वाऱ्यामुळे मासेमारी नौका फुटल्या उत्तनमधील सात ते आठ नौकांचे लाखोंचे नुकसान भाईंदर, ता. २३ (बातमीदार) : वादळी वाऱ्या‍मुळे किनाऱ्याला उभ्या असलेल्या खडकांवर आपटून मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्रकार उत्तन येथे शनिवारी (ता. २२) रात्री घडला. उत्तन येथील ‘जीवन शक्ती’ ही किनाऱ्याला उभी असलेली नौका खडकावर आपटून फुटली. या नौकेचे अक्षरश: तुकडे झाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शनिवारी रात्री १२.३० च्या सुमारास समुद्रात अचानक सोसाट्याचा वारा सुटल्याने मोठ्या लाटा येण्यास सुरुवात झाली. किनाऱ्यापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत ही वादळी परिस्थिती होती. या वेळी भुतोडी बंदर किनाऱ्याला नांगर टाकून उभ्या असलेल्या जीवनशक्ती या मासेमारी नौकेचा नांगर वाऱ्याच्या जोरामुळे तुटला आणि ती खडकांवर आपटली. त्यामुळे या नौकेचे अक्षरश: तुकडे झाले. या नौकेवर चार खलाशी होते. परिस्थितीचा अंदाज येताच त्यांनी याची माहिती नौकेचे मालक सॅबेस्टियन चिंचक यांना दिली आणि ते नौकेतून बाहेर पडले. माहिती मिळताच अनेक मच्छीमारांनी किनाऱ्याकडे धाव घेतली; मात्र वाऱ्याचा जोर अधिक असल्याने मच्छीमारही हतबल झाले. जीवनशक्ती या नौकेव्यतिरिक्त ईश्वरदूत, प्राजक्ता या नौकांचे तसेच चौक येथील एका नौकेचे नुकसान झाले आहे. तसेच वल्हे मारून चालवायच्या सुमारे सात ते आठ छोट्या नौकांचेदेखील यात नुकसान झाले. मिरा-भाईंदर महापालिकेचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान यांनी मच्छीमारांना मदतकार्य केले. वादळी वाऱ्याची पूर्वसूचना मच्छीमारांना मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या नौकांचे मत्स्यव्यवसाय विभागाकडून पंचनामे करण्यात आले आहेत. या सर्वांना सरकारने तात्काळ आर्थिक मदत द्यावी. - शर्मिला गंडोळी, स्थानिक नगरसेविका आपत्तीच्या वेळी होणाऱ्या नुकसानभरपाईसाठी सरकारकडे फारच कमी आर्थिक तरतूद आहे. त्यामुळे मच्छीमारांना तुतटपुंजी मदत मिळते. सरकारने आपल्या आर्थिक तरतुदीमध्ये भरघोस वाढ करावी. - लिओ कोलासो, मच्छीमारांचे नेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com