मुंबई
मद्य मागूनही न दिल्याने बिल देण्यास नकार; ग्राहकाला चोप
हॉटेल मॅनेजरसह वेटरची ग्राहकाला मारहाण
डोंबिवली, ता. ३१ ः अतिरिक्त मद्याची मागणी करूनही वेटरने दिले नाही म्हणून बिल देण्यास नकार देणाऱ्या ग्राहकाला हॉटेलच्या मॅनेजरने व तीन वेटरने मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत घडली. या प्रकरणी हॉटेल मॅनेजर व तीन वेटरविरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण पूर्वेत राहणारे विशाल वीर हे शनिवारी (ता. २९) रात्री बदलापूर पाईपलाईन रोडवरील तरंग हॉटेलमध्ये गेले होते. विशाल यांनी हॉटेलच्या वेटरकडे आणखी मद्याची मागणी केली असता ती देण्यास वेटरने नकार दिला. त्यामुळे विशाल यांनी हॉटेलचे बिल देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने मॅनेजरसह तीन वेटर यांनी विशाल यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.