एसटी बस डेपो बंद असल्याने पनवेलमध्ये प्रवाशांचे हाल | Panvel bus depot | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Bus depot
एसटी बस डेपो बंद असल्याने पनवेलमध्ये प्रवाशांचे हाल

एसटी बस डेपो बंद असल्याने पनवेलमध्ये प्रवाशांचे हाल

नवीन पनवेल : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST bus employee strike) सुरूच असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. संप कधी संपेल, याबाबत अनिश्चितता आहे. संपामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून एसटी महामंडळालाही मोठा आर्थिक फटका (Financial loss) बसतो आहे. शिवाय मिनीडोअर आणि रिक्षा चालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसुली करून सर्वसामान्य प्रवाशांना (commuters in trouble) वेठीस धरले जात आहे. पनवेल आगारातील (Panvel bus depot) बस ८ नोव्हेंबरपासून बंद आहेत. त्यामुळे एसटीच्या मार्गावर खासगी रिक्षा व मिनीडोअरचालकांनी आपले बस्तान बसवले आहे.

हेही वाचा: कोरोना मृतांच्या वारसांना मदत : अर्जासाठी ऑनलाईनची सक्ती नको- हायकोर्ट

प्रशासनाचा कुठलाही अंकुश नसल्यामुळे त्‍यांच्याकडून मनमानी भाडे आकारून प्रवाशांची लूट करण्यात येत आहे. दळणवळणाचे दुसरे कुठले साधन नसल्यामुळे अडीच महिन्यांपासून सर्वसामान्य प्रवासी भरडला जात आहे. तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे ग्रामीण भागातून पनवेल शहरात मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची वर्दळ असते. यामध्ये नोकरदार, विद्यार्थी व वैद्यकीय उपचार घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुख्यतः पनवेलमधून खोपोली, खालापूर, मोहपाडा, आपटा, नेरे, वाजे, उरण, धानसर, तळोजा, वाकडी, खानाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक होते.

परंतु एसटी बंद असल्यामुळे ग्रामीण प्रवाशांना मिनीडोअर किंवा रिक्षाने प्रवास करण्याशिवाय पर्याय नाही. याचाच फायदा घेत मनमानी भाडे आकारले जाते. त्यामुळे लालपरी लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी अपेक्षा प्रवाशांची आहे. खासगी फुल एकीकडे एसटी थांबली असताना खासगी रिक्षा व मिनीडोरला प्रवासी वाढले आहेत. त्यामुळे प्रवासी भाडे जवळपास दुप्पट झाले होते. अनेकांना पर्याय नसल्याने त्यांनी खासगी वाहतुकीचा आधार घेतला आहे. तर प्रवासभाडे जास्‍त असल्‍याने अनेकांनी पनवेलमधील ये-जा कमी केली आहे.

हेही वाचा: दिवाळे गाव होणार पहिले स्मार्ट व्हिलेज; नवी मुंबईतील गावांचा होणार कायापालट

मोठा फटका पनवेल-अलिबाग सेवा अलिबाग हे रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाण आहे. सर्व प्रशासकीय कार्यालये अलिबागमध्ये आहेत. त्यामुळे पनवेल परिसरातील अनेक नागरिकांना अलिबागला प्रशासकीय कामासाठी जावे लागत आहे. एसटी बंद असल्यामुळे अलिबाग-पनवेल खासगी वाहतूकदारांनी भाडे दुपटीने वाढल्यामुळे नागरिकांना भुर्दंड सहन करावा लागतो. इंधन दरवाढीमुळे भाड्यात वाढ संधीचा गैरफायदा घेत नसून सीएनजी गॅस व डिझेलच्या किमती वाढल्यामुळे नाइलाजास्तव प्रवासी भाड्यात वाढ करावी लागली. लॉकडाऊनची झळ सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे रिक्षाचालकांनाही बसली आहे.

बाजारपेठेतील सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे भाडे वाढविल्याचे काही रिक्षाचालकांनी सांगितले. स्वतःचे वाहन नसल्यामुळे एसटी प्रवासासाठी महत्त्वाची आहे. एसटीचे भाडेही परवडणारे आहे. परंतु कित्येक दिवसापासून एसटी बंद असल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे.

- गणेश वाघमारे, मोरबे ग्रामस्थ

प्रशासकीय कामासाठी अलिबागला जावे लागत असल्याने गैरसोय होत आहे. पूर्वी मिनीडोअरचे भाडे शंभर रुपये होते, परंतु एसटी बस बंद असल्याने ते दोनशे रुपये झाले आहे. नाइलाजाने वाढीव भाडे भरावे लागत आहे.

- संदीप तरटे, प्रवासी पनवेल

वाढीव भाडे घेतलेल्या रिक्षाचालकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तत्काळ दंडात्मक कारवाई केली जाते. अशा प्रकारे जर कोणी वाढीव भाडे घेऊन प्रवाशांना वेठीस धरत असेल त्यांनी पनवेल आरटीओशी संपर्क साधावा.

- गजानन ठोंबरे, साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी

नियमित आरोग्य तपासणीसाठी पनवेलला जावे लागते. परंतु सवलतीच्या दरातील एसटी बस बंद असल्याने व रिक्षामध्ये दाटीवाटीने माणसे बसवत असल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे पनवेलला जाणे खूप कमी केले आहे.

- कचरू दरे, वृद्ध प्रवासी, नितळस

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :panvelST Strike
go to top