Manda Mhatre
Manda Mhatresakal media

दिवाळे गाव होणार पहिले स्मार्ट व्हिलेज; नवी मुंबईतील गावांचा होणार कायापालट

नवी मुंबई : केंद्र सरकारच्या (central government) गाव दत्तक योजनेतून नवी मुंबईतील पहिले स्मार्ट व्हिलेज (first smart village) म्हणून दिवाळे गावाला (Diwale village) मान मिळणार आहे. बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदा म्हात्रे (Manda Mhatre) यांच्या पाठपुराव्यानंतर लवकरच गावाचा कायापालट होणार आहे. गावातील दर्जेदार रस्ते, अद्ययावत जेटी, सुनियोजित मासळी मार्केट आदी पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे संपूर्ण देशातील गावांचे स्मार्ट व्हिलेजचे स्वप्न आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्या संकल्पनेतील गाव दत्तक योजनेअंतर्गत आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईतील दिवाळे गाव हे दत्तक घेतले आहे.

Manda Mhatre
मुंबईत कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट

याच अनुषंगाने सोमवारी म्हात्रे यांनी दिवाळे गावचा पाहणी दौरा केला. गावात स्मार्ट व्हिलेज अंतर्गत भव्य, सुसज्ज सर्व सुविधांयुक्त मच्छी मार्केट, उद्यान, मासे सुकविण्यासाठी प्लॅटफॉर्म, स्टेज, समाज मंदिर, स्वाध्याय हॉल, प्रसाधनगृहे, लहान मुलांकरिता खेळणी, विरंगुळा केंद्र , गजेबो गार्डन, बहउद्देशीय इमारत, ओपन जिम, चारचाकी वाहनतळ, भाजी व फळ मार्केट तसेच सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या पायाभूत सुविधा देण्यासाठी तब्बल १५ कोटी रुपये अंदाजे खर्च करण्यात येणार आहे.

म्हात्रे यांनी त्याकरिता आमदार निधीतूनही कोट्यवधींची तरतूद केली आहे. स्मार्ट व्हिलेज योजनेतून दिवाळे गावातील स्थानिकांना विविध रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच गावातील स्वच्छता व सार्वजनिक उपक्रमाला चालना मिळणार आहे. दिवाळे गाव स्मार्ट व्हिलेज होणार असल्याने मंदा म्हात्रे यांनी स्थानिक ग्रामस्थांचे, आयुक्त अभिजित बांगर व त्यांचे सर्व सहकारी तसेच स्थानिक नगरसेविका भारती कोळी यांचे आभार मानले. या प्रसंगी भाजप महामंत्री नीलेश म्हात्रे, माजी नगरसेविका भारती कोळी, महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई, कार्यकारी अभियंता अजय संखे, विद्युत विभागाचे सुनील लाड, बेलापूर विभाग अधिकारी डॉ. मिताली संचेती आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ग्रामीण भागाचा विकास व्हावा, ग्रामीण भागातील नागरिकांना सोई-सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता प्रत्येक गाव हे स्मार्ट व्हिलेज तयार करावे असे स्वप्न पाहिले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गाव दत्तक योजनेच्या माध्यमातून सन २००४ सालापासून दिवाळे गाव हे मी दत्तक घेतले आहे. या गावांमध्ये मी अनेक जेटी उभारल्या आहेत. या गावाच्या विकासासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अनेक कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आता हे गाव स्मार्ट व्हिलेज म्हणून तयार होणार असल्याने स्थानिकांना रोजगार मिळणार आहे, चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा मिळणार आहेत. - मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर विधानसभा क्षेत्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com