Dr. Neelam Gorhe
Dr. Neelam Gorhesakal media

"सरकारने मंजूर केलेले शक्ती विधेयक समाजविकासासाठी महत्त्वाचे ठरणार"

मुंबई : हिवाळी अधिवेशनात (Winter session) सरकारने (Maharashtra government) मंजूर केलेले शक्ती विधेयक (Shakti Act) हे समाजविकासासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (dr neelam gorhe) यांनी केले. मुंबई विद्यापीठाचे (Mumbai university) बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या संयुक्त विद्यमाने अंतराळकन्या कल्पना चावला यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

 Dr. Neelam Gorhe
मुंबईच्या वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट अमृता फडणवीसांचा तर्क

आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव सुधीर पुराणिक आणि अधिसभा सदस्या शीतल शेठ देवरूखकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्य शासनाने मंजूर केलेल्या शक्ती कायद्याला निर्भया प्रकरण, आंध्र सरकारने पारित केलेला दिशा कायदा याची पार्श्वभूमी असून या कायद्यामुळे महिलांविरोधातील अत्याचारांना पायबंद घालण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शक्ती विधेयकात बलात्कार, लैंगिक छळ, सायबर गुन्हे, महिलांवरील ॲसिड हल्ले यांसारख्या गुन्ह्यांसाठी कठोर तरतूद करण्यात आली असून तक्रार दाखल ते दोषारोपापर्यंतची प्रक्रिया अधिक वेगवान करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

शक्ती विधेयकाचे मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार व्हावा, तसेच त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी शक्ती कायदा महिला समन्वय समिती तयार करण्यात आली असून महाविद्यालयाचे कॅम्पस अधिकाधिक सुरक्षित व्हावे, यासाठी सर्वांनी सहभाग घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. २०२० ते २०३० हे कृती दशक असून महिला सुरक्षितता, समान संधी आणि शाश्वत विकासासाठी सर्वांना प्रयत्नशील राहावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com