Lata mangeshkar And panchmukhi hanuman temple
Lata mangeshkar And panchmukhi hanuman templesakal media

पंचमुखी दर्शनाच्या उरल्या फक्त आठवणी; लता दीदींच्या आठवणींना उजाळा

नवी मुंबई : आपल्या सुरेल आवाजाची जादू देशभरातील रसिक श्रोत्‍यांवर करणाऱ्या लतादीदींची (Lata Mangeshkar) मोटार आता पंचमुखी मारुती मंदिरापुढे (Panchmukhi Hanuman Temple) दिसणार नाही. कोकणातील मंगेशी या त्यांच्या गावी जाताना पनवेलच्या (panvel) पंचमुखी मारुती मंदिराजवळ दीदी आवर्जून थांबायच्या. दीदींच्या अचानक जाण्याने मंदिराचे विश्वस्त अशोक गिलडा यांनी दीदींच्या आठवणींना (Lata mangeshkar memories) उजाळा दिला.

Lata mangeshkar And panchmukhi hanuman temple
ठाण्यात प्रभाग रचनेनंतर आरक्षणाचीही धाकधूक; नगरसेवकांचेही धाबे दणाणले

सुमारे अडीचशे वर्षांपूर्वीपासून पनवेल शहराच्या उंबरठ्यावर गाढी नदीच्या तीरावर वसलेले पंचमुखी मारुती मंदिर हे पनवेलचे श्रद्धास्थान. रस्त्यालगत असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरून जाणारे सर्व राजकीय आणि इतर क्षेत्रातील मान्यवर आवर्जून तेथे थांबतात. तर काही वाहनाची काच खाली करून दर्शन घेऊनच पुढे जातात. लतादीदी सुद्धा त्‍याला अपवाद नव्हत्या. १९७० च्या दशकात दीदींचा संगीत क्षेत्रातील प्रवास तेजीत असताना अनेकदा मोटारीनेच प्रवास व्हायचा. त्याकाळात पनवेलमार्गे कोकणातील त्यांच्या मंगेशी गावी जाताना दीदींनी अनेकदा पंचमुखी मारुती मंदिराचे दर्शन घेतल्याचे पनवेलमध्ये बोलले जाते.

पंचमुखी मारुतीची ख्याती पंचक्रोशीत आहे. लतादीदींना सुद्धा याबाबत माहित होते. पनवेलमधून बाहेर पडताना पंचमुखी मारुती मंदिराजवळ लागणाऱ्या वाहनांच्या रांगा, सिग्नल आणि वाहनांच्या हॉर्नचा आवाज त्याकाळी नव्हता. मंदिरापुढचा रस्ता जरी लहान असला, तरी भक्तांना रांग तेव्हाही दिसायच्या. मंदिरात विराजमान मारुतीच्या पंचमुखांचे दर्शन रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या प्रत्येकाला घेता यायचे. त्यामुळे लतादीदींनी मंदिरापुढे मोटार थांबवून आत बसूनच पंचमुखी मारुतीचे दर्शन घेतल्याचे ऐकवीत असल्याचे अशोक गिलडा यांनी सांगितले. मंदिरात स्वतःहून येणाऱ्या किंवा नियोजन करून येणाऱ्या प्रत्येक मान्यवर अतिथींचे आम्ही ट्रस्टतर्फे यथोचित मान सन्मान देऊन देवाचे दर्शन घडवून आणतो.

परंतु कोकणात जाताना लतादीदी अनेकदा मोटार देवळासमोर थांबवून आतूनच दर्शन घ्‍यायच्या. पण त्यांनी कधीच खास दर्शनासाठी विश्वस्तांना सांगावा दिला नाही. त्यांच्या स्वभावाचा हा साधेपणा असल्याचे गिलडा यांनी सांगितले. १९७० ते ८० च्या काळात अनेकदा लतादीदी कोकणातील गावी जाताना देवळाच्या बाहेरूनच पंचमुखी मारुतीचे दर्शन घेतल्याचे भक्तांकडून समजायचे. पण नंतरच्या काळात दीदी कधी मंदिराजवळून गेल्याचे ऐकले नाही. आता दीदींची मोटार पनवेलमधून कधीच जाणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com