ठाणे रेल्वे स्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा

ठाणे रेल्वे स्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा

ठाणे, ता. ८ (बातमीदार) : कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळाल्यामुळे मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक असलेल्या, ठाणे रेल्वे स्थानकातही दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे; मात्र रेल्वे स्थानक परिसरात दुतर्फा तसेच पादचाऱ्यांना चालण्यासाठी आरक्षित पुलावर ठाण मांडून बसलेले फेरीवाले, प्रवाशांची वाट अडवत असल्याने वेळेचे गणित सांभाळत लोकल प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना यांचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दररोज रेल्वे स्थानकात हजारो प्रवाशांची वर्दळ असल्याने स्थानक परिसर ‘ना फेरीवाला क्षेत्र’ करून १५० मीटरवर सीमारेषा आखण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ठाणे रेल्वे स्थानकाची वाहतूक कोंडीतून मुक्तता व्हावी म्हणून ठाणे महापालिकेने रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने उभारलेल्या सॅटिस प्रकल्प उभारला आहे; परंतु ठाणे स्थानकात न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होत असून सॅटिस पूल परिसरात बहुतांश फेरीवाल्यांनी ठाण मांडले असून त्यांनी पुलाखालील परिसर तसेच पुलावरील परिसर व्यापल्याने प्रवाशांना स्थानक गाठताना मोठी कसरत करावी लागत आहे. ठाणे स्थानक परिसरात बसणारे फेरीवाले खाद्यपदार्थांपासून ते कपडे, शोभेच्या वस्तू, खेळणी इत्यादी वस्तुंची विक्री करीत असून गर्दीच्या वेळी फेरीवाल्यांनी पदपथांवर पसरवलेल्या वस्तूंमुळे प्रवाशांना चालताना अडथळा निर्माण होत आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून फेरीवाल्यांना हटकण्यासाठी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडूनही विशेष टीम तैनात करण्यात आली आहे. मात्र असे असूनही ठाणे स्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा मात्र कायम असल्याचे चित्र दिवसभर पाहायवयास मिळते.

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश देत असून प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून रोजच्या रोज तेथिल फेरीवालयांना मॉनिटर करण्याच्या सूचनादेखील तेथील अतिक्रमण पथकाला दिल्या जातील. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रोजच्या रोज कारवाई केली जाते; मात्र कोणी जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करीत असेल, तर याची तपासणी करून चौकशी केली जाईल.
- अशोक भुरपुरे, अधिकारी, अतिक्रमण विभाग, ठाणे पालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com