pratap sarnaik
pratap sarnaik sakal media

मेट्रो कारशेड सरकारी जमीनीवर उभारावी; शिवसेना आमदारांचा प्रस्ताव

भाईंदर : मेट्रो कारशेडला (Metro carshed) राई, मुर्धा आणि मोर्वा गावातून तीव्र विरोध होत असल्यामुळे कारशेडसाठी खासगी जमीन न घेता उत्तन येथील सरकारी जागेवर (Government land) ती उभारण्यात यावी, असा प्रस्ताव शिवसेनेचे (shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Mla Pratap sarnaik) यांनी दिला आहे. ग्रामस्थांच्या विरोधाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे आणि गरज पडल्यास यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली जाईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.

pratap sarnaik
कलिना संकुलात चित्रीकरण कशाला ? विद्यार्थी संघटनेचा सवाल

मिरा-भाईंदर शहरात मेट्रोचे काम सुरू असून त्याची कारशेड राई, मोर्वा, मुर्धा या भागात प्रस्तावित करण्यात आली आहे; परंतु खासगी जमिनी कारशेडसाठी देण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. यासंदर्भात भूमिपुत्रांचे समाधान करण्याची आवश्यकता आहे आणि त्यावर एकमताने निर्णय होणे आवश्यक आहे. मोर्वा गावालगतच खोपरा या भागात सुमारे दीडशे एकर जमीन सरकारी आहे. शिवाय त्याला लागूनच सुमारे दीड हजार एकर जागा सरकारी आहे. या जागांवरील खारफुटीचे क्षेत्र वगळून उर्वरित जागा मेट्रोच्या कारशेडसाठी घेण्यात यावी, असा प्रस्ताव प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

याच परिसरात पुढे मुंबईच्या हद्दीत जगप्रसिद्ध पॅगोडा देखील आहे. ही मेट्रो पॅगोडापर्यंत न्यावी, त्यामुळे भारतीय आणि परदेशी पर्यटकांची चांगली सोय होईल, अशी सूचनाही सरनाईक यांनी केली आहे. मेट्रो कारशेडसाठी खोपरा भागातील सरकारी जागेचा वापर करण्यात यावा, अशी भूमिका काही दिवसांपूर्वी झालेल्या एमएमआरडीए आणि ग्रामस्थ यांच्या बैठकीतही ग्रामस्थांकडून देण्यात आला होता. आता याच प्रस्तावाचे समर्थन प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

कारशेडची जागा बदलण्याबाबत आणि मेट्रो मार्गिकेच्या रस्त्याच्या रुंदीबाबत ग्रामस्थांवर अन्याय होणार नाही अशाप्रकारे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली असून आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेण्यात येईल.
- प्रताप सरनाईक, आमदार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com