mumbai-goa highway
mumbai-goa highwaysakal media

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणानंतरही अपघात; दुर्घटनांतून मुक्तता कधी ?

पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai-goa Highway) चौपदरीकरणानंतरही अपघात, पावसाळ्यात दरडी कोसळणे, खड्ड्यांची टांगती तलवार कायम आहे. नुकतीच परशुराम घाट (Parshuram Ghat) मार्गावर डोंगर पोखरताना दगडासह माती खाली आल्याने दोन पोकलेन अडकून एकाचा मृत्यू झाला होता. या मार्गाला पर्यायी मार्ग असले, तरी ते वाहतुकीस योग्य नसून अरुंद आहेत. अपघाताचे सत्र (Accidents) तर पाचवीला पुजल्यासारखे आहेत. अनेकदा ट्रक, कंटेनर, टॅंकर पलटी होत असतात. नव्याने चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. काही ठिकाणी दर्जेदार रस्ता तयार झाल्याने वाहनांचा वेगही वाढत आहे. यामुळे अनेकदा अपघात घडले आहेत. अशा विविध कारणांमुळे अपघात, दरडी, खड्डे यातून कायमस्वरूपी प्रवाशांची मुक्तता कधी होईल, असा प्रश्न कोकणवासीयांना पडला आहे.

mumbai-goa highway
मुंबई : शिवसेनेचे फेरीवाला धोरण कागदावरच

मुंबई-गोवा महामार्ग हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. अरबी समुद्राच्या किनारपट्टीला लागून १२६९ किलोमीटरचा असलेला हा महामार्ग मुंबई ते केरळमधील कोची या शहरांशी जोडतो. पनवेल, महाड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, सावंतवाडी, पणजी, उडुपी, मंगलोर व कालिकत ही राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील काही महत्त्वांची शहरे आहेत. कोकणातील तिन्ही जिल्ह्यांना जोडणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग. कोकण रेल्वे सुरू होण्यापूर्वी १९९८ पर्यंत राष्ट्रीय जुना महामार्ग १७ हा कोकणातील गावांना मुंबईसोबत जोडणारा एकमेव दुवा होता. या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असायची, तशी आजही आहे. मात्र, वाढती वाहने आणि लोकसंख्येनुसार महामार्गाच्या रुंदीकरणाकडे दुर्लक्ष झाल्याने येथून प्रवास करणाऱ्यांना त्याचे त्रास भोगावे लागत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाट, भोस्ते घाट, परशुराम घाट, कामथे घाट, आरवली घाट, निवळी घाट, अंजनारी घाट, वाकेड घाट, राजापूर घाट, कोडे घाट, नडगिवे घाट, वागदे घाट, अकेरी घाट, इन्सुली घाट इतके सगळे घाट येतात. हा महामार्ग रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यामध्ये असलेल्या वडखळ, डोलवी, गडब गावातून अतिशय अरूंदपणे गेलेला आहे. वडखळ नाक्याची बाजारपेठ सोडली की, अलिबागला सरळ जाणारा रस्तावगळता डावीकडे गोव्याला जाताना डोलवी फाटक, इस्पात कंपनी, जॉन्सन कंपनी या ठिकाणी खूपच अरुंद आणि निमुळता आहे. कशेडी घाट ते सावंतवाडी हे ३०० किलोमीटरचे अंतर आहे. या महामार्गावर कशेडी घाटात परशुराम, भोस्ते, कामथे, ओणी, इन्सुली या ठिकाणी अत्यंत धोकादायक वळणे आहेत. तसेच काही ठिकाणी अरुंद पूल आहेत.

mumbai-goa highway
शिवशाही बस संप काळात गायब; प्रवाशांची होतेय गैरसोय

मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका सोडल्यानंतर पुढे कळंबस्ते फाटा येतो. तेथून पुढे रेल्वे मार्गापासून काही अंतरावर आंबडसकडे फाटा फुटतो. तो लोटे येथे बाहेर पडतो. परशुराम घाटरस्त्याला आंबडसमार्गे रस्त्याचा पर्याय आहे; मात्र त्याचा उपयोग केला जात नसल्याने त्याची नियमित डागडुजी होत नाही. शिवाय, या रस्त्याचे अंतर ८० किमी असून तो जंगलातून जातो. कामथे घाटाला टेरवमार्गे खेर्डी रस्त्याचा पर्याय आहे. कुंभार्ली घाटाला नवजा मार्गाचा पर्याय आहे.
खेड तालुक्‍यातील लोटेपासून पुढे भरणे नाक्‍यापर्यंतचा रस्ता एखाद्या दुर्घटनेमुळे रोखला गेला, तर कोतवली मार्गे जाणाऱ्या रस्त्याचा पर्याय उपलब्ध आहे. खाडीपट्ट्यातील गावांमधून जाणाऱ्या पर्यायी रस्त्याचा उपयोग काही प्रमाणावर केला जातो.

लोटे येथून सुरू होणारा हा ३५ किमी लांबीचा रस्ता खेड शहरात बाहेर पडतो. मात्र, आपत्तीकाळात सरकारने तसेच महामार्ग विभागाने या मार्गाचा वापर करणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे नव्या मार्गाचे काम करतेवेळी आपत्तीबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे. पनवेल ते इंदापूर दरम्यान कोलाड ते इंदापूर चौपदरीकरणाचे काम अद्याप सुरू आहे. तर इंदापूर ते पोलादपूर दरम्यान वीर हद्दीत कामाला सुरुवातच नाही. या भागातील काम पूर्ण झाल्यास मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुसाट होईल.

महत्त्वपूर्ण कशेडी बोगदा

रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा कशेडी घाट महत्त्वाचा पण तितकाच धोकादायक मानला जातो. तो पार करण्यासाठी वाहनांना ४० मिनिटांचा कालावधी लागतो. सद्यस्थितीत पोलादपूर हद्दीतील कशेडी बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून खेड हद्दीतील कामही पूर्णत्वाच्या दिशेने आहे. मे २०२२ पर्यंत काम पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे. या घाटातून प्रवास करताना वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. रसायनवाहू वाहने घाटात कलंडल्याने वाहतूक कोंडी झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. या बोगद्यामुळे वाहनचालकांना वळणदार घाटातून गाडी नेण्याचीही कसरत करावी लागणार नाही. शिवाय ४० मिनिटांच्या प्रवासाचे अंतर केवळ ९ मिनिटांत कापता येणार आहे.

तसेच अपघात आणि वाहतूक कोंडीची समस्याही मार्गी लागेल. यात पर्यटकांबरोबरच गणेशोत्सव व शिमगोत्सवात जाणारे चाकरमान्यांचा प्रवास सोयीस्कर होईल. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या बोगद्यासाठी सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर बोगद्याचे काम रिलायन्सला इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीला देण्यात आले आहे. या कामासाठी रुपये ५०२.२५ कोटी खर्च येणार असून पावणेदोन किलोमीटरचे एकदिशा मार्गाचे वाहतुकीसाठी दोन बोगदे तयार करण्यात येणार आहेत. बोगद्यामध्ये जाण्यासाठी तीन व येण्यासाठी तीन असे एकूण सहा लेन असतील.

मुंबई गोवा चौपदरीकरण महामार्ग

महामार्गावरील रस्ता - किलोमीटर
पनवेल ते इंदापूर - ८४
इंदापूर विभाग - २४.४३०
वीर ते भोगाव - ३९.५७०
भोगाव ते खावटी - १३.६००
कशेडी ते परशूराम घाट - ४३.८००
परशूराम घाट ते आरवली - ३५.९००
आरवली विभाग - ४०
वाकड विभाग- ५०.९००
वाकड ते तळेगाव - ३५
तळेगाव ते कंठे - ३८.८३०
कलमठ ते झरप -४४.१४०
एकूण लांबी - ४५०.१७ किलोमीटर

महामार्गावरील घाटाला पर्यायी मार्ग
* परशुराम घाट- आंबडस मार्ग
* कामथे घाट - टेरवर्मो खेर्डी
* कुभार्ली घाट - नवजा मार्ग
* लोटे ते भरणे नाका - कोतवली मार्ग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com