Bird Flu
Bird Flusakal media

पालघर जिल्ह्यात बर्ड फ्लूबाबत सतर्कता; एकाच ठिकाणी ५०० कोंबड्या मृत्युमुखी!

वसई : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बर्ड फ्लूची साथ (Bird flu) पसरली नसली तरी विरार शहरात एकाच ठिकाणी ५०० कोंबड्या मृत्युमुखी (five hundred hens died) पडल्याने पशुसंवर्धन विभाग (Department of Animal Husbandry सतर्क झाला आहे. जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून रॅपिड फोर्स तयार करण्यात आले आहेत. औषधांचा साठादेखील सज्ज (Medicine stock) करण्यात आला असून कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांना भेटी देण्यात येत आहेत. त्यांना स्वच्छता राखण्याबाबत सूचना करण्यात येत आहेत. तसेच मरतूक कोंबड्या आहेत का, बर्ड फ्लूची लक्षणे आढळतात का, याबाबत तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Bird Flu
मुंबादेवी: लग्नासाठी नाव नोंदणी; तरुणीला ४५ लाखांचा गंडा घालणाऱ्या दोघांना अटक

शहापूरनंतर वसई तालुक्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. डहाणू, पालघर, वाडा, मोखाडा, विक्रमगड, वसई, तलासरी, जव्हार तालुक्यात कुक्कुटपालनाचा व्यवसाय केला जातो. जिल्ह्यात एकूण ३५० नोंदणीकृत व्यवसाय आहेत; तर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठीदेखील नागरिक जोडधंदा करतात. या वेळी एकूण दीड हजाराहून अधिक अंडी व १०० हून अधिक कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत, तसेच तातडीने सर्व्हेक्षण करण्यात आले.

वसई-विरार महापालिकेच्या क्षेत्रातील अर्नाळा वटार या ठिकाणी एकाच पोल्ट्री फर्मवर कोंबड्या मरण पावल्याचे आढळले आहे. त्यामुळे एक किमीचा परिसर सील करण्यात आला आहे. विरार येथे मृत्युमुखी झालेल्या कोंबड्यांचे नमुने घेऊन पालघर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने ते पुणे व भोपाळ येथील केंद्रीय चाचणी केंद्रात पाठवले होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे; मात्र जिल्ह्यात अन्यत्र कुठेही साथ निर्माण झाली नसल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.

ही काळजी घ्या

- पक्षांच्या खाद्याची व पिण्याची भांडी रोज धुणे
- खुराडे स्वच्छ, नीटनेटके ठेवणे
- पक्षी आजारी झाल्यास त्याची माहिती पशुसंवर्धन विभागाला कळवा.
- परिसरात इतर प्रजातीचे प्राणी येणार नाहीत याची दक्षता घेणे.
- मरतूक कोंबडी असेल तर त्याची वाहतूक करू नये.
- कुक्कुट पक्षांना हाताळल्यावर हात स्वच्छ साबणाने धुवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com