मानखुर्द : अमली पदार्थ विकणारी टोळी जेरबंद; पदार्थमिश्रित २०० बाटल्या जप्त | Mankhurd crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime
अमली पदार्थ विकणारी टोळी जेरबंद

मानखुर्द : अमली पदार्थ विकणारी टोळी जेरबंद; पदार्थमिश्रित २०० बाटल्या जप्त

मानखुर्द : गोवंडीच्या शिवाजी नगर पोलिसांनी (shivaji nagar police) शनिवारी (ता. १९) अमली पदार्थमिश्रित (drugs) खोकल्याचे औषध विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश (smuggler gang busted) केला. शिवाजी नगर परिसरातून गुलजार शेख (वय २३) या महिलेसह तिचा पती आतिफ अली शेख (वय २५), तसेच फारूख मणियार (३५), आशिष जैसवाल (२३), सौरभ खान (२४ ) व शहनवाज खान (३५) या आरोपींना अटक (culprit arrested) करण्यात आली. त्यांच्याकडून कोडियन अमली पदार्थमिश्रित २०० बाटल्या कफ सिरप जप्त केला आहे.

हेही वाचा: BMC Election : मनसे-भाजप युती होणार?; चंद्रकांत पाटलांचं महत्वाचं विधान

शिवाजी नगर पोलिसांचे पथक गुरुवारी (ता. १७) भूखंड क्रमांक ८ मधील दुर्गा सेवा संघ परिसरात गस्त घालत असताना गुलजार व आतिफ हे दोन बॉक्स घेऊन जाताना दिसले. पोलिसांना संशय आल्यावर त्यांनी गुलजारकडे चौकशी केली. तिने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केल्यावर पोलिसांचा संशय बळावला. त्यांना पोलिस ठाण्यात आणून बॉक्सची तपासणी केली असता त्यामध्ये कोडियन या अमली पदार्थमिश्रित सिरफच्या २०० बाटल्या आढळल्या.

या बाटल्या जप्त करून त्या दोघांविरोधात गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी वापी (गुजरात)मधून हे कफ सिरप पाठविणाऱ्या फारुख मणियार व आशिष जैसवाल या दोघांना वापीतून, शिवाजी नगर परिसरात सिरफची विक्री करणारे सौरभ व शहानवाजला ताब्यात घेत या टोळीचा पर्दाफाश केला.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top