‘अंबरनाथ पालिकाप्रभाग रचनेत लक्ष घाला’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अंबरनाथ पालिकाप्रभाग रचनेत लक्ष घाला’
‘अंबरनाथ पालिकाप्रभाग रचनेत लक्ष घाला’

‘अंबरनाथ पालिकाप्रभाग रचनेत लक्ष घाला’

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. २० (बातमीदार ः अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने मागील वेळी तयार करण्यात आलेली प्रभाग रचना चुकीची असून त्यात लक्ष देऊन निवडणूक आयोगाला चूक दुरुस्ती करण्याचे आदेश द्यावेत, असे साकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे अंबरनाथ भाजपच्या वतीने घालण्यात आले आहे.
अंबरनाथ भाजप शहराध्यक्ष अभिजित करंजुले -पाटील यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने राज्यपाल कोश्यारी यांची शनिवारी राज भवनावर भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत चुकीची प्रभाग रचना आणि कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेले येथील प्राचीन शिवमंदिर महाशिवरात्रीला भाविकांसाठी खुले करून देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी दिलीप कणसे, खानजी धल, संतोष शिंदे, विश्वासराव निंबाळकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top