घाटकोपरमध्ये राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घाटकोपरमध्ये राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा
घाटकोपरमध्ये राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा

घाटकोपरमध्ये राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा

sakal_logo
By

घाटकोपर, ता. २० (बातमीदार) : राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६० वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा उद्या (ता. २१) पासून घाटकोपरमध्ये होणार आहे. या वर्षी घाटकोपर रेल्वे स्टेशनच्या उपाश्रय लेनवर असलेल्या झवेरबेन पोपटलाल सभागृहात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या ठिकाणी एकूण १७ नाटके सादर होणार आहेत. या नाट्य स्पर्धेमुळे घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला, चेंबूर, विक्रोळी या परिसरातील मराठमोळ्या रसिक प्रेक्षकांना एक हक्काचे नाट्यगृह उपलब्ध होत आहे. कोविड निर्बंधाचे पालन करूनच या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. नाट्य रसिकांना या स्पर्धेत सादर होणाऱ्या नाटकांना उपस्थित राहण्याचे आवाहन झवेरबेन सभागृहाचे व्यवस्थापक दीपक सावंत यांनी केले आहे.

नवीन नाटके, उदयोन्मुख लेखक व दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांना प्रोत्साहन द्यावे आणि दर्जेदार नाट्य कलाकृतींचा आस्वाद घेत स्पर्धेचा उत्साह द्विगुणित करावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top