Water Supply
Water Supplysakal media

नागरिकांनो पाणी जपून वापरा; मिरा-भाईंदरचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद

भाईंदर : मिरा-भाईंदर (Mira bhayandar) शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणाकडून महत्त्वाची कामे हाती घेण्यात आल्यामुळे शुक्रवारी (ता. २५) शहराचा पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद (water supply close) ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा करून (save water) ठेवण्याचे आणि पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन पालिका पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

Water Supply
ठाणे पालिकेची चौकशी सुरू; १५० कोटी रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसल्याचा भाजपचा आरोप

मिरा-भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. यातील स्टेम प्राधिकरणाकडून दररोज ८६ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. स्टेम प्राधिकरणामार्फत ट्रान्सफॉर्मरची देखभाल दुरुस्ती, ९०० मिलिमीटर व १५०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर जलमापक यंत्र बसविणे, घोडबंदर मुख्य रस्त्यावरील रस्ता रुंदीकरणात बाधित होणारी जलवाहिनी स्थलांतरित करणे, तसेच इतर महत्त्वाची कामे हाती घेण्यात आली आहेत.

या कामांसाठी शहराला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी सकाळी ९ ते शनिवारी सकाळी ९ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात एमआयडीसीकडून पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. मात्र स्टेम प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यत मिरा-भाईंदर शहराला कमी दाबाने व उशिराने पाणी मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com