Palghar Zilha Parishad
Palghar Zilha Parishadsakal media

"आयुष्याच्या वळणावर पुस्तकामुळे विद्यार्थी घडतील"

पालघर : ‘आयुष्याच्या या वळणावर’ या पुस्तिकेतून महिला व बालविकास विभागाकडील शाळा व शाळाबाह्य किशोरवयीन मुलींना (Teenager Girls) जीवनकौशल्य व्यवस्थापनअंतर्गत मासिक पाळी व्यवस्थापन, शरीरशास्त्र, आरोग्य व सामाजिक स्थितीची जाणीव करून देण्यात आली आहे. त्याचा उपयोग जिल्ह्यातील जास्तीत जास्त किशोरवयीन मुलींना होऊन भविष्यात होणारे रक्तक्षय, कुपोषण, बालमृत्यू (child death) व मातामृत्यू कमी होण्यासाठी निश्चितच फायदा होणार आहे. पुस्तिका (books Importance) जिल्ह्यातील भावी पिढीसाठी दिशादर्शक व लोकोपयोगी ठरेल, यात शंका नाही, असे प्रतिपादन पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण (Vaidehi vadhan) यांनी केले आहे.

Palghar Zp
Palghar Zpsakal media

पालघर जिल्हा परिषद कार्यालयात व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम ‘आयुष्याच्या या वळणावर’ या पुस्तिकेचे जिल्हा परिषदेतर्फे प्रकाशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, सभापती महिला व बालकल्याण गुलाब राऊत, सभापती कृषी व पशुसंवर्धन समिती प्रतिभा गुरोडा, सभापती बांधकाम व वित्त समिती शीतल धोडी, जिल्हा परिषद सदस्य गणेश उंबरसडा आदी उपस्थित होते.

Palghar Zilha Parishad
वसई-विरारमधील वाहतूक कोंडी फुटेना; प्रशासकीय राजवटीमुळे समस्यांकडे दुर्लक्ष

सिद्धाराम सालीमठ म्हणाले, शाळा व शाळाबाह्य किशोरवयीन मुलींना जीवनकौशल्य व्यवस्थापनअंतर्गत मासिक पाळी व्यवस्थापन, शरीरशास्त्र, आरोग्य व सामाजिक स्थितीची जाणीव करून देण्यात आली आहे. या प्रशिक्षण पुस्तकाच्या माध्यमातून जास्तीत जास्त किशोरी मुलींना फायदा होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com